विशेष प्रतिनिधी
मुंबईः अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. हृदयविकाराचा झटका त्याच्या मृत्यूचे कारण असल्याचे सांगितले जात असले त्याच्या शवविच्छेदन केल्यावरच खरे कारण पुढे येणार आहे. तो 40 वर्षांचा होता. Suspicious death of actor Siddharth Shukla, 40-year-old actor suffered a heart attack?
सिध्दार्थनेटीव्ही शो बिग बॉसचा विजेता होता. सिद्धार्थचा मृतदेह मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला आहे. येथेच शवविच्छेदन केले जाणार आहे. रात्री तो काही औषधे घेऊन झोपला, परंतु त्याने कोणते औषध घेतले होते हे उघड झालेले नाही.
सिद्धार्थ छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘बालिका वधू’ या मालिकेतून त्याने अनेकांची मने जिंकली होती. या मालिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली होती. त्याने बिग बॉस १३मध्ये सहभाग घेतला होता आणि त्या सिझनचा तो विजेताही ठरला होता. त्यानंतर त्याने खतरों के खिलाडी या शोच्या सातव्या सिझनमध्येही सहभाग घेतला होता.
१२ डिसेंबर १९८० साली सिद्धार्थचा जन्म मुंबईत झाला. त्याने एक मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. २००४ साली त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर २००८मध्ये त्याने बाबुल का आंगन छूटे या मालिकेत काम केले. पण ‘बालिका वधू’ या मालिकेने त्याला खरी ओळख मिळवून दिली होती.
Suspicious death of actor Siddharth Shukla, 40-year-old actor suffered a heart attack?
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि वकील सीबीआयच्या ताब्यात!!
- राज्यात एमबीबीएस, एमडीच्या जागा वाढणार, सार्वजनिक खासगी गुंतवणुकीद्धारे नवीन वैद्यकीय महाविद्यालये, अतिविशेषोपचार रुग्णालये स्थापन करणार
- मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंसह सर्वपक्षीय शिष्टमंडळ गुरूवारी घेणार राष्ट्रपतींची भेट
- ग्लोबल जिहाद – इस्लामच्या शत्रुंपासून काश्मीर सोडवा