• Download App
    Emmy Awards 2021 : सुश्मिता सेनचा ‘आर्या’ बेस्ट ड्रामा सिरीजसाठी नॉमिनेट, अभिनेत्रीने शेअर केली खुशखबर । Sushmita sen starrer aarya nominated for best drama series in international emmy awards 2021

    Emmy Awards 2021 : सुश्मिता सेनचा ‘आर्या’ बेस्ट ड्रामा सिरीजसाठी नॉमिनेट, अभिनेत्रीने शेअर केली खुशखबर

    emmy awards 2021 : सुष्मिता सेन बॉलिवूडची एक प्रतिभावान अभिनेत्री आहे. तिने आपल्या कारकीर्दीत अनेक उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. गेल्या वर्षी सुष्मिता 10 वर्षांनंतर ‘आर्या’ या क्राइम ड्रामा मालिकेतून अभिनयात पुनरागमन केले होते. बरेच कलाकार बऱ्याच दिवसांनी चित्रपट आणि शोमध्ये परततात, तेव्हा त्यांना पूर्वीसारखा चांगला प्रतिसाद मिळत नाही, पण सुष्मिताने ‘आर्या’मधील तिच्या अभिनयाने सर्वांना आश्चर्यचकित केले. Sushmita sen starrer aarya nominated for best drama series in international emmy awards 2021


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सुष्मिता सेन बॉलिवूडची एक प्रतिभावान अभिनेत्री आहे. तिने आपल्या कारकीर्दीत अनेक उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. गेल्या वर्षी सुष्मिता 10 वर्षांनंतर ‘आर्या’ या क्राइम ड्रामा मालिकेतून अभिनयात पुनरागमन केले होते. बरेच कलाकार बऱ्याच दिवसांनी चित्रपट आणि शोमध्ये परततात, तेव्हा त्यांना पूर्वीसारखा चांगला प्रतिसाद मिळत नाही, पण सुष्मिताने ‘आर्या’मधील तिच्या अभिनयाने सर्वांना आश्चर्यचकित केले.

    सुष्मिताने उत्कृष्ट अभिनय केला. तिचे केवळ प्रेक्षकांनीच नव्हे तर समीक्षकांनीदेखील खूप कौतुक केले. गतवर्षी सुश्मिताने या वेब सिरीजसाठी अनेक पुरस्कार पटकावले होते. आजही ही सिरीज आणि सुश्मिताची जादू कायम आहे. आता आर्या या वेब सिरीजला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2021 मध्ये नामांकन मिळाले आहे.

    खुद्द सुष्मिता सेनने ही माहिती सोशल मीडियावर दिली आहे. चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर करताना सुश्मिताने लिहिले, ‘भारत… टीम आर्यचे अभिनंदन.’

    सुष्मिता सेनची पोस्ट

    यासोबतच सुश्मिताने नवाजुद्दीन सिद्दीकी आणि वीर दास यांचेही नॉमिनेशनसाठी अभिनंदन केले आहे. नवाजुद्दीनला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि वीर दासला कॉमेडी सिरीज वीर दास : इंडिया कॉमेडी सेगमेंटसाठी नामांकन मिळाले आहे.

    Sushmita sen starrer aarya nominated for best drama series in international emmy awards 2021

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला

    Shahbaz : PAK पंतप्रधानाचा खोटारडेपणा; शाहबाज म्हणाले- भारताकडून आधी युद्धबंदीचे उल्लंघन; रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणार