• Download App
    Sushant Singh Rajputs Case :आता उलगडणार सुशांतसिंगच्या मृत्यूचे रहस्य!सिद्धार्थ पिठानीला NCB कडून अटकSushant Singh Rajput's Friend Siddharth Pithani Arrested by NCB

    Sushant Singh Rajputs Case : आता उलगडणार सुशांतसिंगच्या मृत्यूचे रहस्य ! सिद्धार्थ पिठानीला NCB कडून अटक

    • सुशांतसिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानी याला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली.

    • सिद्धार्थ पिठानी यांना ड्रग्ज प्रकरणात अटक.

    • एनसीबीची एक टीम सिद्धार्थ पिठानीला मुंबईत आणत आहे

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: सुशांतसिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानी याला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग्स प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. सिद्धार्थ याला हैदराबादहून अटक करण्यात आली असून, एनसीबीची एक टीम सिद्धार्थ पिठानी यांच्यासमवेत असून त्याला मुंबईत आणले जात आहे . मुंबईत आणल्यानंतर त्याची चौकशी केली जाईल. Sushant Singh Rajput’s Friend Siddharth Pithani Arrested by NCB

    दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचा मित्र सिद्धार्थ पिठानीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात NCB ने ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. हैदराबादहून त्याला अटक करण्यात . ड्रग्ज केसमध्ये कट रचल्याचा आरोप सिद्धार्थ विरोधात लावण्यात आला आहे, त्याच्या विरोधात कलम 28, 29 आणि 27 ही कलमं लावण्यात आली आहे. सिद्धार्थला आज कोर्टात हजर करण्यात आलं त्यावेळी कोर्टाने त्याला पाच दिवसांची NCB कोठडी सुनावली आहे.

    सिद्धार्थ पिठानी सुशांतसोबत त्याच फ्लॅटमध्ये राहात होता जिथे सुशांतने आत्महत्या केली. सुशांतचा मृतदेह पाहणाऱ्यांपैकी सर्वात पहिला व्यक्ती सिद्धार्थ होता. 14 जून 2020 ला सुशांतने आत्महत्या केली. मुंबईतल्या फ्लॅटमध्ये त्यांनी गळफास लावून घेतला. या घटनेमुळे सगळं बॉलिवूडच हादरलं होतं. सुशांतच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवरही काही गंभीर आरोप केले होते.
    सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी होत असतानाच ड्रग्जचा अँगलही समोर आला. या प्रकरणात रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती अशी काही नावं समोर आली होती. सिद्धार्थ पिठानी हे देखील त्यातलंच एक नाव होतं. आता एनसीबीने त्यालाही अटक केली आहे.

    सुशांतच्या मृत्यूच्या आधी सिद्धार्थ त्याला भेटला होता…

    जुलै 2020 मध्ये सिद्धार्थने आजतकशी चर्चा केली तेव्हा सांगितलं होत की गेल्या वर्षभरापासून मी सुशांतला ओळखतो. आमची मैत्री काही कॉमन मित्रांमुळे झाली. सुशांतसाठी मी काम करत होतो. सुशांतने आत्महत्या केली त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 13 जूनच्या रात्री 1 वाजता सुशांत आणि मी बोलत होतो.

    सुशांत त्याची मॅनेजर दिशाच्या आत्महत्येमुळे त्रस्त झाला होता, तो अस्वस्थ होता. माझं नाव या प्रकरणात जोडलं जातं आहे त्याचा मला त्रास होतो आहे असं सुशांतने सांगितलं होतं असंही त्यावेळी सिद्धार्थ पिठानीने सांगितलं होतं.

    सुशांतचा दिशाच्या मृत्यू प्रकरणात सहभाग आहे असा आरोप करणारे काही बिनबुडाचे लेख, बातम्या लिहिल्या जात होत्या त्यामुळे तो अस्वस्थ झाला होता असंही सिद्धार्थने सांगितलं. आता या प्रकरणात आणखी काय काय समोर येणार आहे ते पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे.

    Sushant Singh Rajput’s Friend Siddharth Pithani Arrested by NCB

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी