- सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्ताने अंकिताने एक व्हिडीओ शेअर करून अभिनेत्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
- अंकिताने सुशांतच्याखूप खास आठवणी आपल्या व्हिडीओमध्ये शेअर केल्या आहेत, हे पाहून सर्वच भावूक
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सुशांतच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. 34 वर्षीय सुशांत त्याच्या घरी मृत अवस्थेत आढळला होता. सुशांतचा मृत्यू त्याच्याशी संबंधित प्रत्येकासाठी एक मोठा धक्का होता. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडेने सुशांत सोबतच्या आठवणी शेअर करत सुशांतला श्रद्धांजलि दिली आहे .अंकिताने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून अंकिताच्या प्रेमाचा अंदाज लावता येतो .अंकिताने प्रत्येक आठवण या फोटोमधून उलगडली आहे .Sushant Singh Rajput Death Anniversary ! ANKITA LOKHANDE REMEMBERS SUSHANT WITH MEMORIES
आज, सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्ताने अंकिताने एक व्हिडीओ शेअर करून अभिनेत्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अंकिताने सुशांतच्या खूप खास आठवणी आपल्या व्हिडीओमध्ये शेअर केल्या आहेत, हे पाहून चाहते देखील भावूक झाले आहेत.
अंकिताने खूप भावनिक कॅप्शनही लिहिले आहे. अभिनेत्रीने लिहिले की ‘14 जून… हा आमचा प्रवास होता !!!! फिर मिलेंगे चलते चलते…’ सुशांतला समर्पित अंकिताचा हा सुंदर व्हिडीओ चाहत्यांमध्ये व्हायरल झाला आहे. चाहत्यांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे आणि यावर कमेंट्सही करत आहेत.
Sushant Singh Rajput Death Anniversary ! ANKITA LOKHANDE REMEMBERS SUSHANT WITH MEMORIES