• Download App
    SUSHANT DEATH MISTRY ! सुशांतसिंग राजपूत मृत्यूचे गूढ एक वर्षानंतरही कायम  ;  CBI अधिकाऱ्यांकडून सुशांत प्रकारणाची नवी अपडेट SUSHANT DEATH MISTRY ! Sushant Singh Rajput Case CBI share latest update of the case

    SUSHANT DEATH MISTRY ! सुशांतसिंग राजपूत मृत्यूचे गूढ एक वर्षानंतरही कायम  ;  CBI अधिकाऱ्यांकडून सुशांत प्रकारणाची नवी अपडेट

    • बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत ने गेल्या वर्षी 14 जूनला आत्महत्या करत या जगाचा निरोप घेतला होता.

    • सीबीआय (CBI), एनसीबी (NCB) या संस्था सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीत गुंतले आहेत. या प्रकरणात प्रत्येकजण नवीन अपडेटची वाट पाहत आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंगच्या संशयास्पद मृत्यूला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. मागच्या वर्षी याच दिवशी सुशांतचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळला होता. सुरुवातीला मुंबई पोलीस या घटनेचा तपास करत होते, त्यानंतर सीबीआयकडे हा तपास वर्ग करण्यात आला. मात्र अद्यापही कुठलाच उलगडा झालेला नाही .चाहते सतत सुशांतला न्याय मिळावा, अशी मागणी करत राहतात. सीबीआय (CBI), एनसीबी (NCB) या संस्था सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीत गुंतले आहेत. या प्रकरणात प्रत्येकजण नवीन अपडेटची वाट पाहत आहे . SUSHANT DEATH MISTRY ! Sushant Singh Rajput Case CBI share latest update of the case

    सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त सीबीआयने हे प्रकरण बंद केले नसल्याचे सांगितले आहे. वृत्तानुसार, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अहवालानुसार, सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सुशांत सिंह राजपूत याचे प्रकरण बंद केल्याचे म्हणणे चुकीचे ठरेल, असे म्हटले आहे. तपास अद्याप सुरू आहे आणि आम्ही प्रत्येक अँगलने चौकशी करत आहोत, असे ही त्यांनी म्हटले आहे.

    एनसीबीकडून सिद्धार्थ पिठाणीला अटक

    अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने अनेक ड्रग पेडलर्सना अटक केली होती. यासह या प्रकरणात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांनाही अटक करण्यात आली होती. रिया जवळपास 1 महिन्यासाठी तुरूंगात होती, त्यानंतर तिला जामीन मिळाला. नुकतेच एनसीबीने या प्रकरणात सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठाणीला अटक केली आहे. सिद्धार्थ सध्या एनसीबीच्या ताब्यात आहे. सिद्धार्थला अटक झाल्यानंतर एनसीबीने सुशांतच्या नोकरांचीही चौकशी केली आहे.

    रिया काय म्हणाली –

    सुशांत सिंह राजपूत प्रकरणात त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिनेही एनसीबीकडे आपले निवेदन नोंदवले ते सध्या बरेच चर्चेत आले आहे. या निवेदनात रिया म्हणाली होती की, सुशांत तिला भेटण्यापूर्वी ड्रग्ज घेत असे आणि त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती होती. सुशांतच्या बहिणीने त्याला ड्रग्ज असलेली काही औषधे खाण्यास सांगितले होते, असा आरोप तिने सुशांतच्या कुटुंबावर केला होता. याच औषधांमुळे सुशांतचा मृत्यू होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले होते.

    SUSHANT DEATH MISTRY ! Sushant Singh Rajput Case CBI share latest update of the case

    Related posts

    Kangana Ranaut : तरुणांना राष्ट्रपतींचे नाव सांगता न आल्याने कंगना रनोट संतापल्या; युद्ध नव्हे टोळांसारखा मेंदू असलेली पिढी नक्कीच नाश करेल!

    Air Marshal : इंडियन आर्मीचा पाकला सज्जड दम; एअरस्ट्राइकवर एअर मार्शल म्हणाले- आमचे कवच कायम सक्रिय

    Pakistani Army Chief : पाकिस्तानी लष्करप्रमुख म्हणाले- देशाला दिलेले वचन पूर्ण केले; भारतीय सैनिक आम्हाला घाबरवू शकत नाहीत