• Download App
    SURPRISE ! अभिनेत्री यामी गौतमचे सर्जिकल स्ट्राइक!चाहत्यांच्या 'उरी'घाव ... SURPRISE ! Actress Yami Gautam ties knot with director Aditya Dhar in secret ceremony

    SURPRISE ! अभिनेत्री यामी गौतमचे सर्जिकल स्ट्राइक ! चाहत्यांच्या ‘उरी’ घाव …

    यामी अडकली विवाह बंधनात, ‘उरी’च्या दिग्दर्शकासोबत घेतले ‘सातफेरे’!


    बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री यामी गौतम  हिने गुपचूप लग्न गाठ बांधली आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री यामी गौतम हिने अनेक चाहत्यांना धक्का दिला आहे .तीने गुपचूप लग्न गाठ बांधली आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. यामी गौतमने आदित्य धरसोबत लग्न केले आहे. आदित्य धर यामी गौतम अभिनित ‘उरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. SURPRISE ! Actress Yami Gautam ties knot with director Aditya Dhar in secret ceremony

    कोरोना काळात बर्‍याच छोट्या-मोठ्या कलाकारांनी लग्न उरकली होती. ज्यात आता यामी गौतमच्या नावाचाही समावेश झाला आहे. यापूर्वी बॉलिवूड अभिनेता वरुण धवन याने देखील जानेवारी महिन्यात आपली बाल मैत्रीण नताशा दलाल हिच्याशी लग्न केले होते. त्यानंतर आता यामी गौतमने देखील लग्न केले आहे. यामी या वधू वेशामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीचे चाहते देखील तिच्या या सोशल मीडिया पोस्टवर सतत अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

    अभिनेत्रीने आपल्या पोस्टची सुरूवात पर्शियन कवी रुमी यांनी लिहिलेल्या कविताने केली होती, तिने लिहिले आहे, “तुझ्या प्रकाशात मी प्रेम करायला शिकले.” अभिनेत्रीने पुढे लिहिले आहे की, ‘आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आशीर्वादाने, आज आम्ही लग्न केले आहे, हा एक अगदी घरगुती सोहळा होता. खूप कमी लोक उपस्थित असल्याने आम्ही हा आनंदी सोहळा आमच्या कुटुंबासमवेत साजरा केला.’

    यामी गौतम आणि आदित्य धर हे एकमेकांना ‘उरी’ या सिनेमापासून ओळखतात. आदित्य एक उत्तम दिग्दर्शकांपैकी एक आहेत. यामी गौतम आणि आदित्यच्या लग्नाच्या फोटोवर शुभेच्छांचा वर्षावर होत आहे. सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. अभिनेता वरुण धवनने सर्वात आधी हा फोटो लाईक केला होता.

    SURPRISE ! Actress Yami Gautam ties knot with director Aditya Dhar in secret ceremony

    Related posts

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!