कोरोनामुळे आई-वडील दोघांनाही गमावलेल्यांना महिला आणि बालकल्याण विभाग आधार देणार आहे. देशभरातील अशा ५७७ बालकांची माहिती राज्यांकडून मिळाली असून त्यांना मायेचे छत्र देणार असल्याचे केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांनी सांगितले. Support for those who have lost their parents, Women and Child Welfare Minister Smriti Irani
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनामुळे आई-वडील दोघांनाही गमावलेल्यांना महिला आणि बालकल्याण विभाग आधार देणार आहे. देशभरातील अशा ५७७ बालकांची माहिती राज्यांकडून मिळाली असून त्यांना मायेचे छत्र देणार असल्याचे केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांनी सांगितले.
कोरोनाच्या दुसºया लाटेत देशभरात अनेकांचा मृत्यू झाला आहे. काही दुर्दैवी कुटुंबांमध्ये आई-वडील दोघांचाही मृत्यू झाला. त्यामुळे अनेक बालके अनाथ झाली आहेत. या अनाथांना संरक्षण देणार असल्याचे इराणी यांनी सांगितले आहे.
स्मृती इराणी यांनी राज्यांकडून मिळालेल्या अहवालाचा हवाला देत ५७७ बालकांच्या डोक्यावरून या महासाथीमुळे आई-वडिलांचं छत्र हरपल्याची माहिती दिली. बालकांच्या संरक्षणासाठी आणि सहकायार्साठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगून इराणी म्हणाल्या, ही मुलं एकटी नाहीत, तसंच ते जिल्हा प्रशासनाच्या संरक्षण आणि देखरेखीखाली आहेत.
अशा मुलांना काऊंसिलिंगची गरज पडली तर राष्ट्रीय मानसिक तपास आणि तांत्रिक विज्ञान संस्थानामध्ये (निमहंस) टीम तयार आहे. मुलांच्या कल्याणासाठी निधीची कोणतीही कमरता भासू दिली जाणार नाही. महिला आणि बालकल्याण मंत्रालयाचे सचिव राम मोहन मिश्रा यांनी भारत लवकरच नऊ देशांमधील आपल्या उच्चायोगांमध्ये आणि दूतावासांमध्ये वन स्टॉप सेंटर सुरू करणार आहे.
कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची काही समाजकंटक परस्पर मुलांची विक्री करत असल्याचे दिसून आले होते. त्याविरोधात स्मृति इराणी यांनी कारवाईचा इशारा दिला होता. बालकांची विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु अशा प्रकारे बालकांची परस्पर दत्तक देवाण-घेवाण करणं किंवा खरेदी-विक्री करणे हा कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. अशाप्रकारचे कृत्य करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860, बालकांची काळजी आणि संरक्षण अधिनियम, 2015 तसेच दत्तक नियमावली, 2017 नुसार कठोर कारवाई कारवाईस पात्र आहे.
ज्या पालकांना बालक दत्तक घ्यायचे आहे, अशा पालकांसाठी कायदेशीर दत्तक विधान प्रक्रियेची सविस्तर माहिती केंद्र शासनाच्या ‘कारा’ (सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी) या प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याआधारे हे पालक दत्तकासाठी अर्ज नोंदणी करू शकतात, असेही महिला आणि बालविकास विभागाने म्हटले आहे.
Support for those who have lost their parents, Women and Child Welfare Minister Smriti Irani
महत्त्वाच्या बातम्या
- सलमान खानचा केआरकेविरुद्ध मानहानीचा खटला, राधेच्या निगेटिव्ह रिव्ह्यूमुळे भडकला ‘सुलतान’
- पंतप्रधान मोदींचे वेसाक ग्लोबल सेलिब्रेशनमध्ये बीजभाषण, जगभरातील बौद्ध संघ प्रमुखांशी व्हर्च्युअली संवाद
- 7 Years Of Modi Government : पीएम मोदींच्या ७ वर्षांच्या सत्तेतील देशात आमूलाग्र बदल करणारे ७ महत्त्वाचे निर्णय
- Coronavirus Cases in India : देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा किंचित वाढ, २४ तासांत २.०८ लाख रुग्णांची नोंद, ४१५७ मृत्यू
- Whatsapp ने भारत सरकारविरुद्ध दाखल केला खटला, नव्या IT नियमांमुळे प्रायव्हसी संपण्याचा दावा