प्रतिनिधी
मुंबई : भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनयाची सत्वशीलता आज हरपली. सुलोचना दीदी गेल्या. स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्योत्तर काळातील एक दीर्घ चित्र प्रवास आज थांबला. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या. दादर येथील सुश्रुषा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. sulochana didi passed away
सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सुलोचना दिदी यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती त्यांची मुलगी कांचन घाणेकर यांनी दिली होती. सोमवारी ( ५ मे ) सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत प्रभादेवी येथील घरी सुलोचना दीदी यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5.00 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत सुलोचना दीदी यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
देव, देश आणि धर्म यांचे संस्कार घेऊन भारतीय चित्रपट सृष्टीत वावरलेल्या भालजी पेंढारकरांच्या मार्गदर्शनाखाली सुलोचना दीदींनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि ती गाजवली. सात्विक अभिनय, स्पष्ट शब्दोच्चार आणि व्यक्तिरेखा जिवंत करण्याचे कसब हे त्यांचे वैशिष्ट्य होते. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीसाठी सुलोचना दीदी यांनी दिलेले योगदान अमुल्य आहे. याची दखल केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने घेतली. त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले.
सुलोचना लाटकर यांची सुलोचना दीदी या नावानेच कलाक्षेत्रामध्ये ओळख होती. सुलोचना दीदींची कारकीर्द कोल्हापुरात भालजी पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली फुलत गेली. चित्रपटाआधी जयशंकर दानवे यांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी पहिल्यांदा रंगमंचावर पाऊल टाकले हा प्रयोग शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी झाला होता.
मराठीबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटांमध्येही केलेलं काम उल्लेखनीय आहे. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेंद्र कुमार, शशी कपूर यांसारख्या नावाजलेल्या कलाकारांबरोबर प्रेमळ आणि कणखर आई, बहिण अशा भूमिका त्यांनी साकारल्या. केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने त्यांना पद्मश्री, महाराष्ट्र भूषण या मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले. कोल्हापुरातील बाबुराव पेंटर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुलोचना दीदींचा जीवनगौरव देऊन सन्मान करण्यात आला होता. सूर्यकांत, चंद्रकांत यांच्यासमवेत त्यांनी कोल्हापुरात ‘मोलकरीण’, ‘वहिनींच्या बांगड्या’, ‘मिठभाकर’, ‘धाकटी जाऊ’ असे चित्रपट केले.
sulochana didi passed away
महत्वाच्या बातम्या
- ताप, डोकेदुखी, मायग्रेनवर वापरल्या जाणाऱ्या १४ औषधांवर बंदी; कोडीन सिरप आणि पॅरासिटामॉलचाही समावेश!
- काँग्रेस नेते पी. चिदंबरम म्हणतात भारताने अमेरिकेसारखी अध्यक्षीय पद्धत स्वीकारावी; पंतप्रधानांचीही असावी फिक्स्ड टर्म
- हॉलिवूड स्टार लिओनार्दो डिकॅप्रियो भारतवंशीय तरुणीला करतोय डेट; जाणून घ्या, कोण आहे मॉडेल नीलम गिल?
- अजय बंगा यांनी स्वीकारला जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाचा पदभार, 5 वर्षांचा असेल कार्यकाळ; पुण्यात जन्म, अहमदाबादेतून एमबीए