बीड जिल्ह्यातील स्वामी विवेकानंद विद्यालयात उपक्रम
विशेष प्रतिनिधी
बीड : कोरोनाचं कारण देत अनेक शाळांनी सक्तीची फिस वसुली सुरू केलीय. यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान देखील होतंय. मात्र या परिस्थितीत देखील बीडच्या दुर्गम भाग असणाऱ्या बावी गावातील एका शाळेने, विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ न देता, त्यांचे शिक्षण सुरूच ठेवलंय. Sugarcane laborers, farmers’ children Schools that offer free education
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असणाऱ्या बावी इथल्या एका खाजगी इंग्रजी शाळेने एक आदर्श उभा केलाय. बावी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात दोनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बरेच विद्यार्थी ऊसतोड मजूर, शेतकरी आणि सर्व सामान्य परिस्थितीतून आले आहेत. त्यामुळे कोरोना काळातील दोन्ही शैक्षणिक वर्षाचं शुल्क शाळेने आकारले नाही. Sugarcane laborers, farmers’ children Schools that offer free education
- बावी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाचा उपक्रम
- ऊसतोड मजूर, शेतकऱ्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षण
- कोरोना काळात दोन्ही शैक्षणिक वर्षाचं शुल्क नाही
- दोनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
- बहुसंख्य ऊसतोड मजूर, शेतकऱ्यांची मुले