लोकशाहीला बेशुद्ध करण्याचं काम सुरू आहे. सर्व समित्या कोमामध्ये आहेत. लोकल सुरु करता येते तिथं कोरोनाचा त्रास होता नाही का? असा सवाल माजी अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकशाहीला बेशुद्ध करण्याचं काम सुरू आहे. सर्व समित्या कोमामध्ये आहेत. लोकल सुरु करता येते तिथं कोरोनाचा त्रास होता नाही का? असा सवाल माजी अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
Sudhir Manugantiwar alleges government
ज्येष्ठ भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विटरवर सभागृहातील व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ते म्हणत आहेत की, नियमाच्या पुस्तिकेनुसार पहिल्या अधिवेशनाच्या आत हे व्हायला हवं. विधानपरिषदेची नावं येत नाहीत म्हणून समित्यांचं काम होऊ द्यायचं नाही. महाराष्ट्राच्या जनतेला यामध्ये राजकारण सुरु आहे हे कळू द्या. लोकशाहीला बेशुद्ध करण्याचं काम सुरू आहे. लोकल सुरु करता येते. तिथं कोरोनाचा त्रास होता नाही. पण उद्या आम्ही बैठक घेतली तर कोरोना व्हायरसने तुम्ही बैठक घेतली तर याद राखा असं सांगितलं आहे.
Sudhir Manugantiwar alleges government
बैठका सुरु झाल्यात असा आदेश द्या अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे करताना तुम्ही नोटिफिकेशन द्यायलाही तयार नाही.
कामकाजाची नियमावली ठरवण्याची आवश्यकता आहे असं सांगत संताप व्यक्त करत मुनगंटीवार म्हणाले की, आपण महाराष्ट्र विधानसभेच्या १८० पानांचं नियमांचं पुस्तक दिलं. ३२० नियम त्यामध्ये आहेत. अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे. कोरोना, कोरोनाचा बाप, कोरोनाचा आजोबाही विचार केला तरी तो सभागृहात घुसू शकणार नाही. एवढी उत्तम व्यवस्था केली त्याबद्दल अभिनंदन, पण याची नियमावली ठरवणार आहात की नाही? कामकाजाची नियमावली ठरवण्याची आवश्यकता आहे.