• Download App
    सर्व व्यवहार ठप्पचा “अचानक लॉकडाऊन”च्या निर्णयावर संसदीस समितीचा ठपका | The Focus India

    सर्व व्यवहार ठप्पचा “अचानक लॉकडाऊन”च्या निर्णयावर संसदीस समितीचा ठपका

    • गृह मंत्रालयाच्या संसदीय स्थायी समिती अहवाल

    विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याचे दिसताच केंद्र सरकारने लॉकडाउन लागू केला. परंतु सरकारने अचानक लॉकडाउन लादल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याचे गृहमंत्रालयाच्या संसदीय स्थायी समितीच्या अहवालात नमूद केले आहे. Sudden lockdown imposition resulted in unprecedented disruptions

    राज्यसभेचे खासदार आनंद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली COVID19 बाबत अहवाल तयार करणारी संसदीय स्थायी समिती स्थापन केली होती. या समितीने गृह मंत्रालयाचा COVID19 अहवाल आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सादर केला.

    अहवालात म्हंटले आहे की, लोकांची आंतरराज्यीय वाहतूक, माल, कारखाने, हॉटेल, खाद्यान्न, पर्यटन इ. बंद करणे आणि इतर आर्थिक कामे याच्यावर लॉकडाऊनमुळे अभूतपूर्व अडथळा निर्माण झाला.

    समितीने ‘कॉव्हिड ‘ सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला आणि त्यासंबंधित समस्यांचे व्यवस्थापन ’’ या विषयीचा 229 हा अहवाल आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सादर केला.

    Sudden lockdown imposition resulted in unprecedented disruptions

    भविष्यकाळात अशा संकटाला त्वरित प्रतिसाद मिळाव, यासाठी केंद्र, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यात समन्वय साधण्यासाठी एनडीएमए 2005 आणि महामारी रोग अधिनियम 1987 अन्वये राष्ट्रीय योजना तयार केली जावी, अशी सूचना समितीने अहवालात केली आहे.

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!