मोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून बारावीच्या विद्यार्थ्याचा मित्रानेच गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीमध्ये उघडणीस आला आहे. याप्रकरणी २० वर्षांच्या तरुणास अटक करण्यात आली आहे. Student commits murder by strangling friend
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून बारावीच्या विद्याथ्यार्चा मित्रानेच गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीमध्ये उघडणीस आला आहे. याप्रकरणी २० वर्षांच्या तरुणास अटक करण्यात आली आहे.
दिल्लीतील प्रीतमपुरा भागात ही घटना घडली. एका उद्यानात २१ एप्रिल रोजी हा प्रकार घडला. मयंक सिंग हा महाराजा अग्रसेन विद्यालयात बीबीए शिकत आहे. त्याने आपल्या मित्राचा आय फोन मोबाईल पाहण्यासाठी घेतला. मित्राला पासवर्ड मागितला. मात्र, त्याने दिला नाही. त्यामुळे चिडून जाऊन मयंकसिंगने त्याचा खून केला. त्यानंतर तो उत्तर प्रदेशात पळून गेला.
मुत मुलाचे वडील एका कारखान्याचे मालक आहे. मुलगा आला नाही म्हणून त्यांनी पोलीसांत तक्रार दिली होती. पोलीसांना रविवारी उद्यानात एक कुजलेला मृतदेह सापडला होता. मृतदेहाजवळ एक मोठा टेडीबेअर होता. त्याचबरोबर काही अंमली पदार्थही सापडले होते. पोलीसांनी या भागातील १०० सीसीटीव्हींची तपासणी केली. यावेळी मृत मुलगा आणि मयंक सिंग उद्यानात येताना दिसले. पोलीसांनी त्याची चौकशी केली असता तो २१ एप्रिलपासून गायब असल्याचे समजले.
पोलीसांनी त्याचा तपास सुरू केला. उत्तर प्रदेशातील आपल्या गावात मयंक सिंग सापडला. पोलीसांनी त्याच्यकडे चौकशी केली असता त्याने झालेला प्रकार कथन केला. सिंगने आपल्या मित्राला त्याच्या मोबाईलचा पासवर्ड मागितला होता. त्याने देण्यास नकार दिला. यावरून दोघांची भांडणे झाली. सिंग याने मुलाला दगडाने मारले. नंतर त्याचा कापडाने गळा आवळून खून केला.
Student commits murder by strangling friend
महत्वाच्या बातम्या
- Exit Polls Results 2021 LIVE On The Focus India : आसाम, पुदच्चेरी भाजपकडे, तमिळनाडू द्रमुककडे, केरळ डाव्यांकडे.. पण बंगालमध्ये गौडबंगाल!
- West Bengal The Focus India Exit Poll Results 2021 : पश्चिम बंगालमध्ये सस्पेन्सच… अगदी एक्झिट पोल्स देखील दुभंगलेले! कोणाला काटावरचे बहुमत? की त्रिशंकू विधानसभा?
- Tamil Nadu The Focus India Exit Poll Results 2021 : तमिळनाडूत द्रमुकचा आवाज; स्टॅलिन नवे करूणानिधी
- Assam The Focus India Exit Poll Results 2021 : आसाममध्ये पुन्हा कमळ फुलणार भाजप आघाडीचा काँग्रेसला झटका
- Kerala The Focus India Exit Poll Results 2021 : केरळमध्ये पुन्हा डावी लोकशाही आघाडी सत्तेवर येण्याचा अंदाज
- Puducherry The Focus India Exit Poll Results 2021 : केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीत भाजपची बाजी ; कमळ फुलणार ; काँग्रेसचे स्वप्न भंगणार