सध्या संजय राऊत यांना शिवसेनेपेक्षा जास्त काँग्रेसची चिंता लागून राहिली आहे .संजय राऊत यांनी काँग्रेसच्या दारुण परभवानंतर राहुल गांधींची पाठराखण करत आजच्या अग्रलेखातून काँग्रेसच्या जुन्या फळीला म्हणजेच G२३ ला चांगलेच फैलावर घेतलं आहे.आता काँग्रेस राऊत यांची तळमळ किती गांभर्याने घेते हे पाहावे लागेल.
STORY BEHIND SAMNA EDITORIAL: worried! Shiv Sainik (hardcore) Sanjay Raut’s concern for Congress – G 23 is just eating and belching – following Rahul Gandhi – while ‘Kashmir Files’ means ‘propaganda’ ….
माधवी अग्रवाल
औरंगाबाद : सामना अग्रलेखातून आज (कट्टर)शिवसैनिक संजय राऊत यांनी आपली काँग्रेसच्या परभवाविषयी तळमळ व्यक्त केली आहे .त्यांनी काँग्रेसला भाजपप्रमाणे आक्रमक होत नवीन इनिंग सुरू करण्याचा सल्लाही (मोलाचा)दिला आहे .सोबतच राहुल गांधींची पाठराखण करत राहुल गांधींना प्रेरणा देखील दिली .या पराभवावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना त्यांनी धारेवर धरत खडा सवाल विचारला आहे की या निडणुकीत तुम्ही कुठे होतात?(खबरदार राहुल गांधींना काही बोललं तर…)…असो तर मुद्दा असा आहे की संजय राऊत हे नेमके प्रवक्ते कुणाचे? आणि काँग्रेस बद्दलची त्यांची तळमळ हायकमांडला कळेल का?…STORY BEHIND SAMNA EDITORIAL: worried! Shiv Sainik (hardcore) Sanjay Raut’s concern for Congress – G 23 is just eating and belching – following Rahul Gandhi – while ‘Kashmir Files’ means ‘propaganda’ ….
हा अट्टहास केवळ भाजप विरोधात ….समस्त विरोधी पक्षांच्या अस्तित्वाचा आणि एकजुटीचा विषय…
राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे भाजपशी वेगळय़ा पद्धतीने लढावे लागेल. ‘जी 23’ गटात असा कोणी लढवय्या असेल तर त्यांनी दंड थोपटून पुढे यायला हरकत नाही, पण ते शक्य आहे असे वाटत नाही.
कपिल सिब्बल यांच्यावर टीकेचे बाण ..
काँग्रेसबाहेरील व्यक्तीने आता काँग्रेसचे नेतृत्व करावे.’ सिब्बल हे वकील आहेत व ते आपल्या अशिलाची बाजू चोखपणे मांडत असतात. या विषयात त्यांचा अशील कोण व ते कोणाची बाजू मांडत आहेत? गांधींनी नेतृत्व सोडावे हे ठीक, पण काँग्रेसला पुढे घेऊन जाणारा, जिंकून देणारा नेता त्यांच्या ‘जी 23’ गटात आहे काय? काँग्रेसच्या ताटातले आणि वाटीतले खाऊन-पिऊन अनेकदा ढेकर देऊन स्वस्थ झालेले नेते ‘जी 23’मध्ये आहेत व काँग्रेस पराभवाचा ते विलाप करीत आहेत. यापैकी किती नेते पाच राज्यांतील निवडणुकांत जमिनीवर उतरले होते? किती जणांनी प्रत्यक्ष प्रचारात झोकून दिले होते?
गुलाम नबी, कपिल सिब्बल व 23 कॅरेटचे नेते या रणधुमाळीत कधी दिसले नाहीत. हे सर्व नेते बाहेर राहून गांधी परिवाराची तारांबळ ‘एन्जॉय’ करीत होते व मनोमन काँग्रेसच्या अपयशाची मनोकामना करीत होते .
राहुल गांधींना प्रेरणा – पाठराखण…
राहुल गांधीं आणि संजय राऊत यांची मैत्री दीन ब दीन मोहोब्बत बढती जाएगी अशीच आहे ….
राहुल गांधी यांनी सत्य सांगितले आहे की, ”निवडणुकीच्या मैदानात भाजपचा सामना करणे कठीण झाले आहे. भाजपवर टीका करणे, त्यांच्या एकाधिकारशाहीवर हल्ला करणे ठीक आहे. ते सुरूच राहील, पण आपल्याला पर्यायी नरेटिव्ह द्यावा लागेल. भाजप ज्या पद्धतीने व तयारीने निवडणुका लढवत आहे त्याचा मुकाबला आपण परंपरागत, जुनाट पद्धतीने करता येणार नाही.
काश्मीर फाईल्स म्हणजे भाजपचा प्रपोगंडा…
संजय राऊत हे काश्मीरी पंडितांच्या वेदनांना प्रपोगंडा असे म्हणाले त्याचबरोबर हा भाजपचा नवा डाव असल्याचेही त्यांनी काँग्रेसला असेच डाव खेळण्याचा सल्ला दिला…
हिजाब’सारखी प्रकरणे उकरून काढणे, ‘कश्मीर फाईल्स’चा चित्रपटातून ‘प्रपोगंडा’ करणे असे प्रकार काँग्रेस किंवा अन्य पक्षांना आता जमायला हवेत”..
संजय राऊत यांनी हा लेखन प्रपंच केवळ भाजप विरोधात केलेला दिसतोय कारण शेवटी राऊत म्हणतात.. काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बाबींत डोके खुपसायची गरज नाही, पण समस्त विरोधी पक्षांच्या अस्तित्वाचा आणि एकजुटीचा विषय असल्यानेच आम्ही आमची मते व्यक्त केली.
बरं ४ राज्यात शिवसेनेचा (दारुण) अतिशय वाईट पराभव झाला त्याचं काय ? त्यावर काही बोलणार की केवळ काँग्रेसची चिंता ….
केवळ भाजप द्वेष …
संजय राऊत यांच्या प्रतिक्रिया जळफळाट पोटदुखी सर्वकाही दर्शविणार्या होत्या आणि आहेत . राऊत म्हणाले की आमच्याकडे नोटा नव्हत्या. त्यामुळे ‘नोटा’पेक्षा कमी मते आम्हाला मिळाली. नोटामुळे मतदानावर परिणाम झाला असे म्हणताना आपण मतदारांचा घोर अपमान करत आहोत याचे भान देखील या महाशयांना राहिले नव्हते….