Monday, 5 May 2025
  • Download App
    Story Behind Samna Editorial : केंद्राकडून काय आणायचे ते आणा-स्वागतच आहे-मुख्यमंत्र्यावर टीका करू नका! दुर्घटनाग्रस्त भागात भाजपसेना पोहचल्याने शिवसेना भडकली Story Behind Samna Editorial: Bring what you want from the Center - Welcome - Don't criticize the Chief Minister! Shiv Sena erupted when BJP reached the accident affected area

    Story Behind Samna Editorial : केंद्राकडून काय आणायचे ते आणा-स्वागतच आहे-मुख्यमंत्र्यावर टीका करू नका! दुर्घटनाग्रस्त भागात भाजपसेना पोहचल्याने शिवसेना भडकली

    • शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर असणारा राग पुन्हा एकदा व्यक्त केला आहे.

    • कोकणात पाऊस-पुराने नुकसान झालेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाणून घेतल्या. केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत त्यांनी कोकणचा दौरा केला.मदतीसाठी तत्पर उभे राहिले .मात्र हे सत्ताधारी सेनेला चांगलेच खटकले .

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: महाराष्ट्र अनेक संकटाला तोंड देत आहे. या संकटात शेकडो जणांचे हकनाक बळी गेले आहेत. असं असताना आता राजकीय पातळीवर सत्ताधारी शिवसेनेच्या मुखपत्रातुन भाजपवर पुन्हा एकदा राग व्यक्त करण्यात आला आहे . सामनाच्या अग्रलेखाचा रोख हा भाजपसेनेकडे असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले .Story Behind Samna Editorial: Bring what you want from the Center – Welcome – Don’t criticize the Chief Minister! Shiv Sena erupted when BJP reached the accident affected area

    ‘तळीयेसारख्या गावांचे पुनर्वसन करणे हे केंद्राचे नसून राज्याचेही कर्तव्य आहे. केंद्र सरकार हे राज्याराज्यांचे मायबाप आहेच. त्याविषयी दुमत असण्याचे कारण नाही. पण ‘आमचा बाप दिल्लीचा’ ही भूमिका राज्यातील विरोधी पक्षाने घेणे कितपत योग्य आहे?’ असा सवाल करत शिवसेनेने केला आहे .

    महाराष्ट्रात एक सरकार आहे. मुख्यमंत्री आहेच आहे व ही व्यवस्था लोकशाही तसेच घटनात्मक मार्गाने सत्तेवर आली आहे. त्यामुळे तळिये-चिपळूणपर्यंत सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, नांदेडपर्यंत जेथे जेथे जलप्रलयाने नुकसान केले त्या प्रत्येक घरात मदत पोहोचविण्यासाठी ठाकरे सरकारला शर्थ करावी लागेल.

    तळीये, चिपळूणवासीयांना देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, प्रवीण दरेकरांनी धीर दिला मात्र शिवसेनेला हे काही रूचले नाही .सामनातून हा रोष स्पष्ट दिसून आला .

    काय आहे सामनात –

    बाकी कुणी या संकट प्रसंगाचे राजकीय पर्यटन करून व्यक्तिगत राग-लोभाचा चिखल उडवीत असेल तर तो त्यांचा प्रश्न. केवळ पाहायला आलो नाही, तर सर्वतोपरी मदतही देणार, असे विरोधी पक्ष सांगतोय. आपले राज्य, आपले सरकार यांच्यावर विश्वास न ठेवणाऱया विरोधी पक्षाविषयी आणखी काय बोलावे! केंद्राकडून काय आणायचे ते आणा; स्वागतच आहे.

    महाराष्ट्रातील दुर्घटनाग्रस्त भागांत राजकीय पर्यटन सुरू झाले आहे. ते थांबले तर मदत आणि पुनर्वसन कार्यास अधिक गती येईल. महाड, चिपळूणला सगळय़ात जास्त फटका बसला. तळीये गावातील दुर्घटना भयंकर आहे. तेथे 82 जणांचा मृत्यू झाला. 32 जण अद्यापही बेपत्ता आहेत. सुरुवातीला जोरदार पावसामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण झाले, पण या अडथळय़ांतून सरकारी यंत्रणा मार्ग काढीत असतानाच ‘राजकीय पर्यटना’ने यंत्रणेलाच धारेवर धरायला सुरुवात केली.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात बसून सरकारी यंत्रणेस कामाला जुंपत असतानाच तिकडे विधान परिषदेचे ‘वि. प. ने.’ दरेकर व माजी मंत्री महाजन हे धावाधाव करीत महाडला पोहोचायचा प्रयत्न करू लागले. शेवटी पाण्याच्या प्रवाहात त्यांना गटांगळय़ा खाव्या लागल्या व सरकारी यंत्रणेस होडय़ा वगैरे घेऊन त्यांना वाचवावे लागले.

    मुख्यमंत्री, मुख्य सचिव, पालकमंत्री यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेणे, सूचना देणे हे गरजेचेच असते. पण मुख्यमंत्र्यांपाठोपाठ केंद्रीय मंत्री नारायण राणे, देवेंद्र फडणवीस त्यांचा फौजफाटा घेऊन तळियेत पोहोचले. आता महाराष्ट्राचे महामहिम राज्यपालही तेथे निघाले आहेत.

    पुन्हा या अशा राजकीय पर्यटनाचे गांभीर्य किती व फोटोबाजी किती हा प्रश्न आहेच. त्यात दोन दिवसांपूर्वी तळियेत केंद्रीय मंत्री गेले व जाहीर केले की, ग्रामस्थांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देऊ. प्रश्न आव्हाड घरे बांधून देतील की केंद्राच्या मदतीने श्री. राणे, हा विषय नाही. या संकटसमयी सरकारविरोधकांनी मढय़ावरचे लोणी खाण्याचा प्रयत्न करू नये हेच सांगणे आहे.

    केंद्र सरकार हे राज्याराज्यांचे मायबाप आहेच. त्याविषयी दुमत असण्याचे कारण नाही, पण राज्याच्या लोकनियुक्त सरकारला आम्ही मानत नाही ही भूमिका राज्याच्या हिताची नाही. राज्य सरकारने केंद्र सरकारविषयी तक्रारीचा सूर लावलेला नाही. असे असतानाही, ‘आमचा बाप दिल्लीचा’ ही भूमिका राज्यातील विरोधी पक्षाने घेणे कितपत योग्य आहे?

    केंद्रीय मंत्री दुर्घटनाग्रस्त स्थळी ‘पर्यटन’ करण्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात येतात असा आरोपही सामनातून केला गेला आहे .

     

     

    Story Behind Samna Editorial: Bring what you want from the Center – Welcome – Don’t criticize the Chief Minister! Shiv Sena erupted when BJP reached the accident affected area

    Related posts

    जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला तब्बल 15 वर्षांनी पुण्यात अटक; ATS ची कारवाई!!

    राहुल गांधी तर फक्त “निवडक” चुकांची जबाबदारी घेतली; पण काँग्रेसच्या चुकांची किंमत सगळ्या देशाला मोजावी लागली!!

    “नरकातला स्वर्ग” पुस्तकाच्या प्रकाशनाचे निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत शरद पवारांच्या घरी; स्वतः पवारांनीच दिली माहिती!!