सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ गुजरातमधील केवडिया येथे उभारण्यात आलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला पर्यटक जास्त पसंती देत आहेत. अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. statue of unity news
विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ गुजरातमधील केवडिया येथे उभारण्यात आलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला पर्यटक जास्त पसंती देत आहेत. अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. statue of unity news
गुजरातमध्ये नर्मदा नदीमध्ये सरदार सरोवर धरणामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यात आला आहे. याठिकाणी कुटुंबासह पर्यटनाला येण्याचे प्रमाण वाढले आहे. सरदार पटेल यांना मानवंदना देण्याबरोबरच येथील पर्यटनाच्या सुविधाही पर्यटकांना आकर्षित करत आहेत. या ठिकाणी मुलांसाठी उभारण्यात आलेले न्युट्रिशन पार्क, आरोग्य व्हॅन आणि नदीच्या काठावर कॅम्पींग आणि रॅफ्टींगची सुविधा पर्ययकांना आकर्षित करत आहे. statue of unity news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणाचे वर्णन एकदा तरी भेट दिलीच पाहिजे, असे केले होते. सातपुडा आणि विंध्यांचल पर्वतरांगामध्ये नर्मदेच्या तिरावर वसलेले हे ठिकाण आता पर्यटकांची पसंती बनले आहे.
statue of unity news
गुजरातचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव गुप्ता या प्रकल्पाचे सुरूवातीपासून प्रमुख आहेत. त्यांनी सांगितले की, पंतप्रधानांचे स्वप्न आहे की हे ठिकाण आदर्श टुरिस्ट डेस्टिनेशन बनावे. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली हे ठिकाण संपूर्ण कुटुंबांसाठी आनंददायी पर्यटन डेस्टिनेशन बनले आहे. या परिसरातील स्थानिक वारसा पाहण्यासाठी अनेक ठिकाणांहून पर्यटक येत असतात.
चीनी व्हायरसच्या महामारीच्या अगोदर या ठिकाणी दररोज १३ हजार पर्यटक येत होते. सध्या ही संख्या १० हजारांवर आली आहे. पर्यटन डेस्टिनेशन बनल्यामुळे सुमारे तीन हजार आदिवासी तरुणांना थेट तर १० हजार कुटुंबाना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळाला आहे.