विशेष प्रतिनिधी
नवी मुंबई : राज्यातले अनेक एसटी कर्मचारी मुंबईत हजेरी लावण्यासाठी मुंबई-पुणे महामार्गावरून जात आहेत. मात्र पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करून एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईत जाऊन द्यायचं नाही, यासाठी चंग बांधला असून ते त्यांना ताब्यात घेत आहेत.महामार्गावर मोठ्या प्रमाणात पोलिसांनी बंदोबस्त केला आहे .
खारघर टोल नाक्यावर प्रत्येक गाडीची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. त्यामध्ये एसटी कर्मचारी असेल त्यांना ताब्यात घेतलं जात आहे आतापर्यंत ६०ते ८० एसटी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती प्राप्त होत आहे
– मुंबईला जाणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना रोखले
– पुणे – मुंबई महामार्गावर कडक तपासणी
– पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
– मुंबईत जाऊन द्यायचं नाही, यासाठी चंग बांधला
– एसटी कर्मचाऱ्यांना हजेरीसाठी जाताना रोखले
– ६० ते ८0 एसटी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले