विशेष प्रतिनिधी
बीड – एसटी महामंडळाचे खाजगीकरण करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र एसटीच्या खासगीकरणाला आता कर्मचाऱ्यांनी आक्रमक विरोध केला आहे.
बीड आगारातील कर्मचाऱ्यांनी या विरोधात एकजूट दाखवली आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठीचा लढा अधिक तीव्र होताना पाहायला मिळत आहे. हे सर्व होत असताना पर्याय म्हणून राज्य सरकारकडून खाजगीकरणाचा घाट घातल्याची शक्यता वर्तवली जातेय.
सरकारकडून होत असलेल्या या हालचालीमुळे एसटी कर्मचारी संतापले आहेत. बीड आगारातील कर्मचाऱ्यांनी “एकच नारा संघर्ष हमारा” चलो मुंबई च्या घोषणा दिल्या आहेत.
– एसटी महामंडळाच्या खाजगीकरणाचे षडयंत्र ?
– खासगीकरणाला कर्मचाऱ्यांचा आक्रमक विरोध
– ठाकरे – पवार सरकारचा आलिंगन देऊन पाठीत खंजीर खुपसण्याची खेळी
– बीडचे एसटीचे कर्मचारी संतापले
– एकच नारा संघर्ष हमारा” चलो मुंबईचा दिला नारा
– एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकणासाठीचा लढा अधिक तीव्र करणार
ST Corporation Privatization conspiracy?, St workers angry