वृत्तसंस्था
सांगली : शहर आज दाट धुक्यात हरवून गेले.थंडीमुळे शहरावर धुक्याची चादर पसरली होती. थंडी बरोबर धुक्याच्या अनुभव सांगलीकरांना मिळाला.या धुक्याचा प्रभाव सकाळी १० पर्यंत होता, त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला होता.
गेल्या काही दिवसांपासून सांगलीमध्ये थंडी वाढली आहे. हुडहुडी भरवणाऱ्या थंडीमुळे सांगलीकर गारठले असताना आज पहाटेपासून सांगली शहरात प्रचंड धुके पडले होते.
कृष्णाकाठी धुक्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. सांगली शहरावर तर धुक्याची चादर पहाटेपासून पसरली होती.सकाळी १० वाजेपर्यंत सांगली धुक्यात हरवून गेली होती.तसेच शहरा बरोबरच ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी धुके पसरले होते.त्यामुळे सांगलीकरांना थंडी बरोबर धुक्याचाही अनुभव मिळाला,तसेच त्यामुळे शहरातल्या जनजीवनावर काही काळ परिणाम झाल्याचा दिसून आला.
- सांगलीवर पसरली गर्द धुक्याची चादर
- धुक्याचा प्रभाव सकाळी १० पर्यंत
- जनजीवनावर परिणाम, कृष्णाकाठी धुक्याचा प्रभाव
- काही दिवसापासून थंडीमुळे सांगलीकर गारठले
- ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी धुके
Spread over Sangli A sheet of thick fog
महत्त्वाच्या बातम्या
- UP Assembly Election : उत्तर प्रदेशात 10 फेब्रुवारी ते 7 मार्च असे सात टप्प्यांत होणार मतदान, वाचा सविस्तर…
- Assembly Election २०२२ Date : पाच राज्यांमध्ये निवडणूकीची घोषणा, १० मार्चला निकाल, यूपी-पंजाब-उत्तराखंड-गोवा आणि मणिपूरमध्ये कधी होणार मतदान? वाचा सविस्तर…
- दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना कोरोनाची लागण , ट्विट करून दिली माहिती