- असहिष्णुते विरोधातील आंदोलनात अवॉर्ड वापसी केली, पुढे त्याचे काय झाले?
- पदक वापसी करून खेळाडूंना शेतकरी आंदोलनाचा विचका करायचाय का?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पंजाबमधील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंनीही पाठिंबा व्यक्त करून पदके परत करण्याची तयारी दाखविली आहे. अर्जुन पुरस्कार विजेते सज्जनसिंग चीमा हे मोदी सरकारच्या शेती धोरणाविरोधात खेळाडूंचे संघटन करत आहेत. sportspersons support farmer agitation
त्यांच्या या मोहिमेस यश येतानाही दिसत आहे. पण खरा प्रश्न पुढेच आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा, मोदी सरकारच्या धोरणांना विरोध वगैरे सगळे ठीक आहे. पण अवॉर्ड वापसीसारखी पदक वापसी मोहीम चालवून हे खेळाडू साध्य काय करणार आहेत किंवा साध्य काय करू इच्छितात?, याचा नेमका विचार होणे अधिक गरजेचे आहे. sportspersons support farmer agitation
शेतकरी आंदोलन ऐन मजधारेत आले असताना हा गंभीर प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. कारण अगदी चारच वर्षांपूर्वी असहिष्णुतेचा डंका पिटून अवॉर्ड वापसीसारखी मोहीम चालविण्यात आली त्यावेळच्या बातम्या आणि त्याचे विश्लेषण बारकाईने वाचले, ऐकले, पाहिले तर लक्षात येईल की सुरवातीला असहिष्णुतेविरोधात genuine वाटणारे आवाज अवॉर्ड वापसीचे नाटक सुरू झाल्यानंतर खोटे वाटायला लागले. त्यांच्यातील फोलपणा सामान्य नागरिकांच्या लक्षात आला.
मीडियातून त्यावेळी त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्याला हळूहळू सोशल मीडियातून विरोध व्हायला लागला आणि नंतर तर ते अवॉर्ड वापसीवाले सगळे वेगवेगळ्या मुद्द्यांवर उघडे पडले. नागरिकांनी तर नुसती अवॉर्ड वापसी करू नका, त्याच्या बरोबर मिळालेले पैसे, पर्क्स, इतर लाभ देखील परत करा, अशा खिल्ल्या उडविल्या. असहिष्णुतेचा मुद्दा तर तडीस लागला नाहीच, पण आत्तापर्यंत झाकलेली सव्वा लाखाची मूठ उघडी पडली.
शेतकरी आंदोलनाच्या पाचव्या दिवशी आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू आणि अर्जुन पुरस्कार विजेते सज्जनसिंग चीमा यांनी मोदी सरकारच्या शेतीविषयक धोरणाविरोधात खेळाडूंना संघटित करायला सुरवात केली. त्याला काहीसे यशही येते आहे. पंजाबमधील प्रतिभावान खेळाडू आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करत आहेत.
त्यातून आंदोलनाचे गांभीर्यही देशवासीयांच्या लक्षात येत आहे. मोदी सरकार राजकीय दृष्टीनेही घेरले जात आहे. पण त्याचवेळी शेतकरी आंदोलनात खलिस्तान समर्थक, इस्लामिस्ट, शाहीनबागी आंदोलनातील घटक घुसल्याचेही लपून राहिलेले नाही. किंबहुना ते expose होताना दिसताहेत.
sportspersons support farmer agitation
आता त्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंची भर पडताना दिसत आहे. चीमा हे पंजाबमधील आपल्या सहकारी खेळाडूंच्या संपर्कात असून शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी सर्व खेळाडूंनी त्यांना मिळालेले पुरस्कार राष्ट्रपतींकडे परत करावेत असे आपले म्हणणे पटवून देत आहेत. चीमा यांच्या या मोहिमेला काही प्रमाणात यश आले असून ३० हून अधिक माजी ऑलिम्पिकपटू आणि अन्य स्पर्धांमध्ये पदके मिळवणाऱ्या खेळाडूंनी पाठिंबा दिला आहे. यामध्ये गुरमेल सिंह, सुरिंदर सिंग सोढी यांचही समावेश आहे. हे दोघेही १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये हॉकीच्या संघाचे सदस्य होते. या संघाने या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते.
पद्मश्री तसेच अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू करतार सिंह, हॉकी खेळाडू राजबीर कौर यांच्यासहीत ३० खेळाडू राष्ट्रपतींकडे भेटीसाठी वेळ मागणार आहेत. राष्ट्रपतींनी वेळ न दिल्यास हे खेळाडू ५ डिसेंबर रोजी दिल्लीत जाऊन आपले पुरस्कार राष्ट्रपती भवनाबाहेर ठेऊन येणार आहेत.
पण हे करताना अवॉर्ड वापसी मोहिमेचे पुढे काय झाले? असहिष्णुता विरोधी आंदोलनाचा मागमूस तरी उरला काय?, याचा त्यांनी विचार केला आहे काय?, केला असेल तर शेतकरी आंदोलनही तसेच फसावे असे त्यांना वाटते काय?, तसाच परिणाम त्यांना पदक वापसीचा व्हावा असे वाटते काय? याचा विचार हे खेळाडू करीत आहेत काय?