राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येत्या 15 वर्षांत अखंड भारत साकार होईल आणि त्या साकारण्यामध्ये जे अडथळे आणतील ते नष्ट होतील, अशी राजकीय भविष्यवाणी केली आहे. Spiritual heritage in the concept of Swami Vivekananda and Yogi Arvind
अर्थात अखंड भारत ही संकल्पना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्याच्या जन्मापासूनच स्वीकारली आहे 1925 राजकीय दृष्ट्या खंडित भारताची संकल्पना तेवढी पृष्ठभूमीवर आलेली नव्हती. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखंड भारत संकल्पनेचा राजकीय संबंध कमी तर सांस्कृतिक आणि अध्यात्मिक अधिक संबंध आहे. आणि तो संबंध स्वामी विवेकानंद आणि योगी अरविंद यांच्या वैचारिक आणि अध्यात्मिक भरणपोषणातून आलेला आहे.
– जननी जन्मभूमिश्च
स्वामी विवेकानंद आणि अरविंद हे दोन्ही अध्यात्मिक पुरुष अखंड भारत संकल्पनेचे अध्यात्मिक उद्गाते आहेत. किंबहुना भारत वर्षाची संकल्पनाच या दोन्ही महापुरुषांनी भारत मातेच्या रूपात पाहिली आहे. पाश्चात्य भौतिक राष्ट्र संकल्पनेचा ही नक्की वेगळी आहे. अखंड भारत ही संकल्पना या दोन्ही महापुरुषांना आपली आध्यात्मिक धरोहर वाटत आली आहे. “जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी” अशा आशयातून भारत माता ही त्यांना ललामभूत वाटत आली आहे.
– पाश्चात्त्य धाटणी नव्हे
पाश्चात्य भौतिक आणि भौमिक राष्ट्रवादाच्या संकल्पने पेक्षा वेगळ्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक राष्ट्रवादातून अखंड भारताची संकल्पना डॉ. मोहन भागवत यांनी अधिक स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. किंबहुना मोहन भागवत यांच्या मांडणीत नवे काही नाही. नवी आहे ती फक्त त्यांनी सांगितलेली 15 वर्षांची मुदत. त्याच विषयी देशभरात राजकीय वर्तुळातून क्रिया – प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत. यातल्या आक्रस्ताळा प्रतिक्रिया सोडल्या तर अखंड भारताची संकल्पना डॉ. मोहन भागवत हे कशी साकारणार आहेत…?? त्यांची रणनीती काय आहे…?? आणि त्याचे प्रारूप काय आहे हे त्यांनी अधिक स्पष्ट करावे, अशी मागणी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष संयुक्त जनता दलाचे प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी केली आहे.
– डेमोग्रफिकल चेंज नाही
अर्थातच डॉ. मोहन भागवत यांनी अखंड भारताची संकल्पना विशद करताना स्वामी विवेकानंद आणि योगी अरविंद यांच्या संकल्पनेला अखंड भारत साकार होईल, असे स्पष्ट केले आहे म्हणूनच डॉ. भागवत यांची संकल्पना स्वाभाविकपणे अध्यात्मिक पार्श्वभूमीची मानली पाहिजे. इथे कोणताही “डेमोग्राफीकल चेंज” अथवा “संघरचनात्मक फेरबदल” याविषयी डॉ. मोहन भागवतांनी भाष्य केलेले नाही, हे नेमकेपणाने लक्षात घेतली पाहिजे.
– राजकीय पेक्षा सांस्कृतिक अधिक
तर डॉ. भागवत यांनी भारताची शतकानुशतकाची अध्यात्मिक – सांस्कृतिक धरोहर यातूनच अखंड भारत साकार होईल, अशी संकल्पना मांडली आहे. यात राजकीय अंश नाही असे म्हणण्यात मतलब नाही. पण त्यामध्ये सर्वस्वी राजकीय अंश आणि आशय आहे. असे मानणे देखील चूक आहे. म्हणूनच डॉ. मोहन भागवत यांनी अखंड भारताची संकल्पना विशद करावी अशी मागणी करणे यात गैर नाही. परंतु, त्याची रणनीती उघडपणे सांगणे हे तितकेच गरजेचे नाही. पण त्या दृष्टीने आणि त्या दिशेने जर कणखर पावले पडणार असतील तर ती स्वयंभूपणेच अखंड भारताची कल्पना विशद करत जातील ही वस्तुस्थिती आहे.
– शेड्स वेगळ्या तरीही
स्वामी विवेकानंद योगी अरविंद ते सावरकर आणि राम मनोहर लोहिया या भारतातल्या विविध नेत्यांनी मांडलेल्या अखंड भारताच्या संकल्पनांचा ढोबळ मानाने आढावा घेतला तर तो “जशाचा तसाच” अखंड भारत असेल असा आग्रह त्यांनी धरल्याचे दिसत नाही किंबहुना सांस्कृतिक आणि अध्यात्मिक धरोहर हाच अखंड भारताचा मूलभूत आधार आहे हा समान धागा या सर्व विचारवंतांमध्ये दिसून येतो ही वस्तुस्थिती आहे. मग भले त्याचा शेड्स काहीशा वेगवेगळे असतील…!! नेमका हाच डॉ. मोहन भागवत यांनी मांडलेल्या अखंड भारत संकल्पनेचे संकल्पनेचा मुलभूत गाभा आहे…!!