खर्च हा नियोजनाचा महत्वाचा हिस्सा आहे. पण कुठे आणि कसा पैसा खर्च करायचा याची शिस्त लागणे महत्त्वाचे असते. यासाठी तुम्हाला शिस्तबद्ध पद्धतीने आर्थिक नियमांचे पालन करावे लागेल. तुमच्याकडे शिल्लक रक्कम गुंतविल्यास खूप मोठा रिटायर्टमेंट प्लान तयार होऊ शकतो. यासाठी आपल्या प्रत्येक वैयक्तिक खर्चासाठी प्लानिंग गरजेचे आहे. सर्व खर्चांची एक यादी तयार करायला हवी. वस्तूंच्या महत्त्वानुसार त्यांना प्राथमिकता द्यायला हवी.Spending is an important part of planning, don’t spend more than you earn
सर्वात महत्त्वपूर्ण खर्च यादीत वर राहतील. त्यापेक्षा कमी महत्त्वाचे खर्च असे अनूक्रमे लिहायला हवे. गुंतवणूक केल्यानंतर, विमा हप्ता, सर्व बिले, कर्ज दिल्यानंतर इतर गोष्टींवर खर्च करण्यासाठी तुमच्याकडे किती रक्कम उरते हे लिहून ठेवा. आता वरील यादीत सर्वात वर लिहिलेल्या वस्तूसाठी पैसे बाजूला काढून ठेवा. सर्वात खाली लिहिलेल्या वस्तूसाठी खर्च करणे गरजेचेच आहे का ? याचा विचार करा. तो खर्च टाळून ही रक्कम वाचवू शकता. ही रक्कम खर्च करण्याऐवजी गुंतवणूक करा.
आपल्या गुंतवणूकीच्या गरजा पूर्ण करा त्यानंतर इतर गरजांकडे वळा. त्यानंतर उरलेल्या पैशातून मौजेच्या वस्तू घेऊ शकता. जास्तीत जास्त पैसे वाचविण्यासाठी डिस्काऊंट ऑफर्सचा लाभ घ्या. एखाद्या वस्तूची ऑनलाईन किंमत जाणून घ्या. क्रेडिट कार्ड कॅशबॅक ऑफरचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. मोठी खरेदी करण्याचे आधी प्लानिंग करा व तसे पैसे साठवून ठेवा. आपल्याला होत असलेल्या कमाईपेक्षा जास्त रक्कम खर्च केल्यावर तुम्ही आर्थिक संकटात सापडू शकता.
पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड हे आपल्याला क्षमेतेपेक्षा अधिक खर्च करण्यास प्रेरित करतात. या जाळ्यात अडकून आपण अशा वस्तूदेखील घेतो ज्यांची आपल्याला गरज देखील नसते. अशावेळी आपल्याला खर्च करण्याची सवय लागली आहे हे अनेकांना समजण्यासाठी उशीर होतो. त्यामूळे खर्चात वाढ होत राहते. त्यामुळे आपल्या खर्च करण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करु नका. योग्य वेळी स्वतःच्या खर्चाला मुरड घाला.