• Download App
    शिवसेना-भाजपची शाब्दिक फटकेबाजी थांबेना; संजय राऊतांना शिवसेना भवनात फटके मारण्याचा निलेश राणे यांचा इशारा Spat between shiv Sena and BJP increases

    शिवसेना-भाजपची शाब्दिक फटकेबाजी थांबेना; संजय राऊतांना शिवसेना भवनात फटके मारण्याचा निलेश राणे यांचा इशारा

    प्रतिनिधी

    मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून शिवसेना आणि भाजप मध्ये सुरू असलेली शाब्दिक फटकेबाजी थांबायचे नाव घ्यायला तयार नाही. भाजपच्या नेत्यांची शिवसेना भवनावर हल्ला करण्याची हिम्मत नाही. त्यांच्यात तेवढा दम नाही, अशी कुरापत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनात अग्रलेख लिहून काढली. त्याला भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले. संजय राऊत यांनी आमची हिम्मत काढू नये. आमच्यात एवढी ताकद आहे की त्यांना शिवसेना भवनात नेऊन फटके मारू, अशी धमकीच निलेश राणे यांनी दिली आहे. Spat between shiv Sena and BJP increases



    भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या शिवसेना भवन फोडण्याच्या म्हणजे शिवसेना फोडण्याच्या कथित विधानानंतर दोन्ही हिंदुत्ववादी पक्षांच्या शाब्दिक फटकेबाजी ऊत आला आहे. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांना धमकावत आहेत. यामध्ये संजय राऊत यांच्या बरोबरच आमदार राजन साळवी आघाडीवर आहेत. त्यांनी प्रसाद लाड यांना उत्तर देताना शिवसेना भवन फोडायचे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे पाय चेपण्या इतके सोपे नाही, असे म्हटले.

    तर संजय राऊत यांनी आजच्या अग्रलेखात भाजपने आपल्या मूळ कार्यकर्त्यांना बाजूला फेकले आणि बाडग्यांना पालखीत मिरवत आहेत, अशी टीका केली. प्रसाद लाड हे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आल्याचा हा संदर्भ आहे. सामनातील अग्रलेखवरून निलेश राणे यांनी संजय राऊत यांना भाजपच्या कार्यकर्त्यांची हिम्मत काढू नका. शिवसेना भवनात नेऊन फटके मारू, असा इशारा देऊन टाकला आहे

    Spat between shiv Sena and BJP increases

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!