विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : व्यक्तीच्या मदतीसाठी कायमच बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कायम पुढे असतो. पुन्हा एकदा सोनू सूदने माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. भीषण अपघातात जखमी अशा बेशुद्धावस्थेत पडलेल्या १९ वर्षीय तरूणाचे सोनू सूदने प्राण वाचवले आहेत.sonu sood
अपघात पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील कोटकपूर बायपास जवळील आहे. येथे १९ वर्षीय तरूणाचा अपघात झाला. या अपघातात तरूण जबर जखमी झाला होता.
तेथून जाणाऱ्या बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने अपघात पाहिला. आणि तो तेथेच थांबला. अपघातग्रस्त तरूणाला वाचवण्यासाठी सोनू सूदचा आटापाटा सुरू झाला.
दोन गाड्यांच्या अपघातात एक तरूण जबर जखमी झाला. ड्रायव्हरच्या बाजूचा दरवाजा लॉक झाला होता. बेशुद्धावस्थेतील तरूणाला बाहेर पडणं कठीण होतं.
https://www.instagram.com/reel/CZwlYgDqvcI/?utm_source=ig_web_button_share_sheet
अशावेळी सोनू सूदने धावत जाऊन तरूणाला तात्काळ गाडीतून बाहेर काढलं. त्यानंतर त्याने त्याला रूग्णालयात दाखल केलं.