रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात युक्रेनच्या विविध शहरांमधून मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी देशात परतले आहेत. पालक तासनतास विमानतळावर त्यांची वाट पाहत असताना मुलांना सुखरूप आणि सुरक्षित पाहून त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून येत आहेत.
मोदींच्या मस्तकी आईचा आशीर्वाद भारतीय म्हणतात आमच्या मस्तकी मोदींचा आशीर्वाद.Son Returns from Ukraine: Mother’s darling Modi brings back thousands of mother’s son! Son returns from battlefield Ukraine – Crying father says now this is Modiji’s son …
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आज मोदींचा त्यांच्या आई सोबतच फोटो व्हायरल झाला .मोदी आईचे लाडके आहेत आणि त्यांनी अशाच अनेक लाडक्यांना मायदेशात सुखरूप परत आणले आहे . ऑपरेशन गंगा या मोहिमेतंर्गत युक्रेन युद्धभूमीवरून नागरिक मायदेशी सुखरूप परतत येत आहे. जवळपास 18 हजार भारतीयांना मायदेशी आणण्यात मोदी सरकारला यश आलं आहे.मुले सुखरूप मायदेशी परतल्यावर त्यांच्या पालकांना कोण आनंद झाला हे शब्दात मांडणे कठीण …अशाच एका भावूक वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि सांगितले की, त्यांच्यामुळेच त्यांचा मुलगा देशात परतला आहे, ज्याची त्यांनी आशा गमावली होती…आता हा जो परतला आहे तो माझा नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुलगा आहे .हे त्यांचेच आशीर्वाद अन् त्यांचेच प्रयत्न आहेत आज माझा मुलगा माझ्या डोळ्यासमोर जिंवंत उभा आहे .Son Returns from Ukraine: Mother’s darling Modi brings back thousands of mother’s son! Son returns from battlefield Ukraine – Crying father says now this is Modiji’s son …
त्यामुळे, गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या मुलांच्या चिंतेत असलेल्या पालकांचा जीव भांड्यात पडला आहे. आजही राजधानी दिल्ली विमानतळावर आपल्या पाल्यांना घेण्यासाठी पालक पोहोचले होते. त्यावेळी, श्रीनगरच्या एका पित्यास अश्रू अनावर झाले. तर, मोदींमुळेच माझा मुलगा परत आला, असेही त्यांनी बोलून दाखवले.
संजय पंडिताचा मुलगा युक्रेनमधील सुमी येथे शिकत होता, जिथे रशिया-युक्रेन युद्धामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. जेव्हा त्यांचा मुलगा ध्रुव देशात परतला तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. संजय पंडिता डोळ्यात आनंदाश्रू घेऊन म्हणाले, ‘मला सांगायचे आहे की, परत आलेला हा मुलगा माझा मुलगा नसून मोदीजींचा मुलगा आहे. त्यांनी आणले आहे.’
मी असं म्हणेल की माझा मुलगा परत नाही आला, मोदींचा मुलगा आलाय. कारण, मोदींनी माझ्या मुलास भारतात परत आणलंय. आम्हाला आशाच नव्हती, सुमी शहरात जी परिस्थिती पाहात होतो. त्यावरुन, आम्ही आशाच सोडून दिली होती. मी भारत सरकारचे आभार मानतो, त्यांनी माझा मुलगा मला परत मिळवून दिला, असे म्हणत काश्मीर निवासी संजय पंडिता यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. संजय यांचा मुलगा ध्रुव हा युक्रेनच्या सुमी शहरात अडकला होता.
माझ्या भावाने मुलाला विचारलं बेटा तुला खायला काय आणू, तर मुलाने केवळ पाणी मागितलं. म्हणजे गेल्या कित्येक दिवसांपासून ते पाणीही पिऊ शकले नाहीत, बर्फ वितळवून ते पाणी पित होते. म्हणून, पाण्याची बाटली घेऊन आम्ही आलोय, असेही भावनाविवश झालेल्या पित्याने म्हटले.
दरम्यान, युक्रेनमधून सुमारे २० हजार भारतीय बाहेर पडले असून, ‘ऑपरेशन गंगा’द्वारे आतापर्यंत ४८ पेक्षा अधिक फेऱ्यांद्वारे १० हजारांपेक्षा जास्त भारतीयांना परत आले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय वायू सेनेकडून आणि इतर विमानांच्या फेऱ्या करण्यात येत आहे. आज दिल्ली विमानतळावर काही विमानांचे लँडींग झाले. त्यावेळी, मुलांना पाहून पालक भावूक झाले होते.