Solar Storm 2021 may hit earth on sunday : सूर्याच्या पृष्ठभागावरून तयार झालेले एक सौर वादळ अतिशय वेगाने पुढे येत आहे. रविवारी ते पृथ्वीवर धडकणार असल्याने यामुळे सॅटेलाइट सिग्नल बिघडू शकतात, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. यासह विमानांचे उड्डाण, रेडिओ सिग्नल आणि हवामानदेखील प्रभावित होऊ शकते. स्पेसवेदर.कॉम वेबसाइटच्या मते, सूर्याच्या वातावरणामध्ये या सौर वादळाची उत्पत्ती झाली आहे, ज्यामुळे चुंबकीय क्षेत्राच्या प्रभुत्व असलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. Solar Storm 2021 may hit earth on sunday, Read Effects on earth and people
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सूर्याच्या पृष्ठभागावरून तयार झालेले एक सौर वादळ अतिशय वेगाने पुढे येत आहे. रविवारी ते पृथ्वीवर धडकणार असल्याने यामुळे सॅटेलाइट सिग्नल बिघडू शकतात, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. यासह विमानांचे उड्डाण, रेडिओ सिग्नल आणि हवामानदेखील प्रभावित होऊ शकते. स्पेसवेदर.कॉम वेबसाइटच्या मते, सूर्याच्या वातावरणामध्ये या सौर वादळाची उत्पत्ती झाली आहे, ज्यामुळे चुंबकीय क्षेत्राच्या प्रभुत्व असलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो.
दुसरीकडे, जे लोक उत्तर किंवा दक्षिण अक्षांशांमध्ये राहतात त्यांना रात्री सुंदर ऑरोरा दिसू शकतो. ऑरोरा पृथ्वीच्या ध्रुवांजवळ रात्रीच्या आकाशात चमकणारा प्रकाश आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने वादळाची गती 1609344 किलोमीटर प्रति तास इतकी नोंदविली आहे. एजन्सीचे म्हणणे आहे की, याचा वेग आणखीही असू शकते. त्याच वेळी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर अंतराळात एखादे मोठे वादळ आले तर पृथ्वीच्या बहुतेक सर्व शहरांतील वीज जाऊ शकते.
सौर वादळाचा पृथ्वीवर काय परिणाम?
मिळालेल्या माहितीनुसार, या सौर वादळामुळे पृथ्वीचे बाह्य वातावरण गरम होऊ शकते, ज्याचा थेट परिणाम उपग्रहांवर होईल. हे फोनच्या सिग्नल, सॅटेलाइट टीव्ही आणि जीपीएस नेव्हिगेशनवर परिणाम करेल, ज्यामुळे व्यत्यय येऊ शकतो. त्याच वेळी विद्युत वाहिनीत करंट येण्याचा धोकादेखील आहे, ज्यामुळे ट्रान्सफॉर्मर खराब होऊ शकतात. तथापि, पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र त्याविरुद्ध संरक्षणात्मक ढाल म्हणून कार्य करते, म्हणून असे होण्याची शक्यता नगण्य आहे.
यापूर्वीही आली सौर वादळे
सौर वादळ पहिल्यांदाच येत नाहीये, यापूर्वी 1989 साली अशीच घटना घडली होती. त्यावेळी वादळामुळे कॅनडाच्या क्यूबेक सिटीची वीज सुमारे 12 तासांपर्यंत गेली. ज्यामुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्याहीपूर्वी 1859 मध्ये जियोमॅग्नेटिक वादळ आले होते, त्या वादळामुळे युरोप आणि अमेरिकेतील टेलिग्राफ नेटवर्क नष्ट केले होते.
Solar Storm 2021 may hit earth on sunday, Read Effects on earth and people
महत्त्वाच्या बातम्या
- न्यूझीलंडचा व्लॉगर कार्ल रॉक भारतात ब्लॅकलिस्ट, Visa नियमांच्या उल्लंघनाचा आरोप
- केजरीवाल सरकारने DTC बसेसच्या खरेदीत केला 3500 कोटींचा घोटाळा, भाजप आरोपांवर उपमुख्यमंत्री सिसोदिया म्हणाले- आश्चर्य वाटतंय!
- 36 लाख दूध उत्पादकांच्या ‘अमूल’ने केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या निर्मितीवर मानले आभार, आणखी एका सहकार क्रांतीचे केले स्वागत
- चीनचा नवा डाव : जेनेटिक इंजिनिअरिंगने सैनिकांना शक्तिशाली बनवत आहे ड्रॅगन, अमेरिकाही चिंतित
- दिल्लीमध्ये ध्वनी प्रदूषण केल्यास 1 लाखापर्यंत दंड, वाचा पूर्ण यादी, काय-काय केल्याने होऊ शकतो दंड!