प्रतिनिधी
सोलापूर : सोलापुरात पिसाळलेल्या कुत्र्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता. या कुत्र्याने अनेकांना चावा देखील घेतला. त्याची दहशत पसरली होती. Solapur Dog panic died natrualy
या कुत्र्याला जीवे मारण्यासाठी काही तरुण काठ्या घेऊन त्याच्या पाठीमागे लागले होते. मात्र, कुत्र्याने त्यांची देखील पळता भुई थोडी करून ठेवली. या कुत्र्यामुळे होम मैदान परिसरात दिवसभर दहशत पसरली होती. कुत्रा पिसाळलेला असल्याने काही तासांतच नैसर्गिक मृत्यू झाला.
सोलापुरातील मोकाट कुत्र्यांचा वावर हा वाढला असून मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचे हल्ले हे नागरिकांवर होत असतात. त्यामुळे अशा कुत्र्यांच्या संख्या नियंत्रणावर प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
- सोलापुरात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत
- होम मैदान परिसरात दिवसभर दहशत
- अनेकांना चावा, शेळीचे नरडे धरले होते
- काही तरुण काठ्या घेऊन त्याच्या पाठीमागे लागले
- कुत्र्याचा काही तासांतच नैसर्गिक मृत्यू
- सोलापुरातील मोकाट कुत्र्यांचा वावर
- बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी
Solapur Dog panic; died natrualy