अमित सादने सुद्धा स्मृती इराणींबद्दल चेतन भगतच्या पॉडकास्टमध्येही याबाबत सांगितले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : टीव्ही अभिनेत्री आणि केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी नुकतीच एका मुलाखतीत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांची आठवण काढली. मुलाखतीदरम्यान स्मृती इराणींनी त्या क्षणाचा उल्लेख केला जेव्हा त्यांना सुशांतच्या मृत्यूची बातमी पहिल्यांदा समजली होती. स्मृती म्हणाल्या की, जेव्हा मला सुशांतच्या मृत्यूची माहिती मिळाली तेव्हा खूप वाईट वाटले. इतकंच नाही तर त्यांनी लगेचच अभिनेते अमित सादला फोन केला, कारण स्मृती यांना भीती वाटत होती की तेही असे पाऊल उचलतील. Smriti Irani remembers Sushant Singh Rajput
सुशांतच्या मृत्यूच्या दिवसाची आठवण करून देताना नीलेश मिश्राच्या द स्लो इंटरव्ह्यूमध्ये स्मृती इराणी म्हणाल्या – ज्या दिवशी सुशांतचा मृत्यू झाला त्या दिवशी मी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये होते. तेथे बरेच लोक उपस्थित होते, परंतु ही बातमी ऐकल्यानंतर मी त्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये राहू शकले नाही.
अन् अनेक वर्षांनी स्मृती इराणींना ‘त्या’ कटू आठवणींमुळे झाले अश्रू अनावर
मला वाटत होते की त्याने हे टोकाचे पाऊल उचलण्या अगोदर एकदा मला फोन करायला हवा होता. मी त्याला म्हटले होते की तू स्वत:ला मारू नकोस. स्मृती इराणी यांनी सांगितले की, त्या सुशांतला तेव्हापासून ओळखतात जेव्हा तो मुंबईत त्यांच्या शेजारच्या सेटवर काम करत होता. एवढच नाही तर त्यांनी सुशांतला दिग्दर्शक शेखर कपूर यांची मास्टर क्लास घेण्यासाठी सुद्धा बोलावले होते.
स्मृती इराणींनी सांगितले की, जसे मला सुशांतच्या मृत्यूबद्दल समजले तेव्हापासून मला अमित साद बद्दल भीती वाटू लागली. मी त्याला तत्काळ फोन केला आणि विचारले की तू कसा आहेस? त्याने मला सांगितले, मलाही राहयचे नाही, त्या वेड्याने हे काय केले. मला जाणवले की काही गडबड नको व्हायला. अमित मला म्हणाला की तुम्ही कामात व्यस्त असाल, मी म्हणाले हो आहे, पण आपण कृपया बोलूयात. त्यानंतर आम्ही सहा तास फोनवर बोललो.
सुशांतच्या मृत्यूनंतर अमित सादला इंडस्ट्री सोडायची होती –
मागील वर्षी प्रसारमाध्यमांसमोर अमित सादने खुलासा केला होता की, सुशांतच्या मृत्यूच्या बातमीनंतर तो पूर्णपणे विचलीत झाला होता आणि तेव्हा स्मृती इराणींनी त्याची खूप मदत केली होती. चेतन भगतच्या पॉडकास्टमध्ये अमितने म्हटले होते की, मलाही नाही माहिती की त्यांना कसं काय माझ्या त्रासाबद्दल जाणवलं होतं. त्या काळत त्या बऱ्याचदा मला फोन करत होत्या. आम्ही सहा तास बोललो होतो. तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की मला आता या इंडस्ट्रीत काम करायचे नाही आणि पर्वतांमध्ये जाऊन राहण्याची इच्छा आहे.
Smriti Irani remembers Sushant Singh Rajput
महत्वाच्या बातम्या
- ‘’भ्रष्टाचारावर बोलण्यापूर्वी राहुल गांधींना लाज वाटली पाहिजे, ते स्वत: … ‘’ रविशंकर प्रसाद यांचा घणाघात!
- पुण्यातील ऐतिहासिक पुण्यश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या जागेवर दर्ग्याचं अतिक्रमण – मनसेचा दावा!
- उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण; पंतप्रधान मोदींचे मानले आभार
- बोफोर्सच्या बदल्यातून मोदी – अदानींवर आरोप; काँग्रेसला राहुल गांधींमध्ये सापडले विश्वनाथ प्रताप सिंहांचे रूप!!