• Download App
    (लाईफ स्किल्स) : स्मित हास्य हीच यशाची खूण।  Smile is the key to success

    लाईफ स्किल्स : स्मित हास्य हीच यशाची खूण

     

    संस्कृतमध्ये एक म्हण आहे, ज्याच्याकडे सिंहासारखे धैर्य असेल त्याच्याकडे मोठी संपत्ती चालून येते. आंत आणि बाहेर जाणाऱ्या श्वासाइतकेच आस्था आणि वैराग्य हे दोन्ही एकमेकाला पूरक आहेत. तुम्ही श्वास आत घेता पण तो जास्त काळ आत रोखून धरू शकत नाही, तुम्हाला तो बाहेर सोडावाच लागतो. त्याचप्रमाणे गोष्टी घडण्यासाठी तुम्हाला आस्था असावी लागते तसेच सोडून देण्यासाठी वैराग्य असावे लागते. जेव्हा तुम्हाला भरभराटीची हाव नसते तेंव्हा ती तुमच्याकडे चालून येते. सुबत्ता प्राप्त होण्यासाठी जर केवळ स्वत:च्या मेहनतची गरज असेल तर असे अनेक लोक कां आहेत जे खूप मेहनत करतात पण त्यांची भरभराट होत नाही? ही अगम्य गोष्ट किंवा नशीब अध्यात्माने उचलून धरली आहे. सगळी भौतिक सृष्टी लहरींच्या एका नियमाने चालते जी आपल्याला दिसते त्यापेक्षा सूक्ष्म आहे.  Smile is the key to success

    अध्यात्मामुळे बुद्धीला आणि अंतर्ज्ञानाला धार चढते. जेंव्हा तुम्ही आस्था आणि वैराग्य यात समतोल साधता तेव्हा तुम्हाला अंतर्ज्ञान प्राप्त होते. फायद्याबरोबरच सेवा, गोष्टी मिळविण्यासाठीची धडपड आणि त्याच बरोबर समाजाला परत देण्यासाठीची करुणा. अंतर्ज्ञान म्हणजे योग्य वेळी योग्य विचार येणे आणि हाच व्यवसायात यश मिळण्यासाठी असलेला एक महत्वाचा घटक आहे. तुमच्या जबाबदाऱ्या आणि ध्येय जितके मोठे तितकी तुम्हाला ध्यान करण्याची जास्त गरज असते.

    प्राचीन काळी ध्यान हे आत्म्याच्या शोधासाठी, सिद्धी प्राप्त होण्यासाठी आणि दु:ख आणि त्रासावर मात करण्यासाठी वापरले जायचे. आजच्या काळात मनावरचा ताण,समाजातील तणाव यासाठीही ध्यान करावे लागते. करायचे खूप असते आणि वेळ थोडा असतो आणि तेवढी शक्ती नसते. तुम्ही तुमच्या कामाचा भारही कमी करू शकत नाही आणि वेळही वाढवू शकत नाही. पण तुम्ही तुमची शक्ती, ऊर्जा वाढवू शकता. ध्यानामुळे तुमचे तुमचा ताण तणाव नाहीसा होतो इतकेच नाही तर तुमच्या क्षमताही वाढतात, तुमची मज्जासंस्था आणि मन बळकट होते.शरीरातील विषारी द्रव्यांचा निचरा होतो आणि सर्व प्रकारे तुमचे तेज वाढते. आपण जड मूलतत्व आणि चैतन्य या दोन्हीपासून बनलो आहोत. शरीराच्या काही भौतिक गरजा असतात आणि आपल्या आत्म्याचे पोषण अध्यात्माने होते. सर्वात महत्वाचे म्हणजे आनंदाने बहरून जाणे, आत्मविश्वास, करुणा,उदारपणा आणि कोणीही घालवू शकणार नाही असे स्मित हास्य हीच यशाची खूण आहे. जीवनात काहीही झाले तरी या गोष्टी तुम्ही टिकवू शकलात तर तुम्ही खऱ्या अर्थाने यश मिळवले आहे.

     Smile is the key to success

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!

    Sangram thopte संग्राम थोपटेंना काँग्रेसने दिले तोकडे बळ, पवारांनी नेहमीप्रमाणे केला विश्वासघात; थोपटेंना निवडावा लागला भाजपचा पर्याय!!