- चौदाव्या वर्षी बनली अंतरराष्ट्रीय ब्युटी ब्रँडची ब्रँड अँम्बेसिडर
विशेष प्रतिनिधी
मुंबई : रोजच्या जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा मिळवताना संघर्ष करणारी. मुंबईच्या धारावीसारख्या झोपडपट्टी भागात राहणारी मात्र आपल्या चिमुरड्या डोळ्यात मोठे स्वप्न पाहणारी स्लम प्रिन्सेस मलिशाच्या स्वप्नाला मोठी भरारी मिळाली आहे.. Slum princess mlishaa kharvaa
परिस्थिती कुठलीही असेल मनापासून जर स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. तर ते पूर्ण होतं हे मलिशाच्या गोष्टीतून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मलिशाने काही दिवसापूर्वी तिच्या बोलक्या डोळ्यातून एक स्वप्न बघितलं आणि आज ते स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसतोय. मलिशा सध्या एका आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्युटी ब्रँडचा चेहरा आहे. फॉरेस्ट इसेन्शियल या ब्युटी ब्रँडने त्यांच्या एका नवीन कलेक्शनचा चेहरा म्हणून मलिशाचीं निवड केली आहे.
हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमन मुंबईत एका व्हिडिओच्या शूटिंगसाठी आला असता. त्याने मलिशाला पहिल्यांदा पाहिलं.जेव्हा मलिशाने त्याला तिच्या स्वप्नांनं बद्दल सांगितलं. त्याला तिच्या स्वप्नांचा आश्चर्य वाटलं आणि तिचं कौतुकही तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने निधी उभारणी केली..
त्याने तिचं इंस्टाग्रामवर पेज तयार करून दिलं. त्या पेजला आता लाखो फॉलोअर्स आहेत. हे फॉलोअर्स तिच्या यशाचे साक्षीदार आहेत. मलिशा च्या बोलक्या डोळ्याने आणि तिच्या सौंदर्याने हॉलीवुड करांनाही भुरळ घातली आहे मलिशाच्या या यशावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Slum princess mlishaa kharvaa
महत्वाच्या बातम्या
- बँकांमधून आजपासून 2000 च्या नोटा मिळणार बदलून, पण धावपळीची गरज नाही; रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचा निर्वाळा
- 2000 ची आणण्याच्या बाजूने नव्हते मोदी, साठेबाजीचा सांगितला होता धोका, इच्छा नसूनही द्यावी लागली होती परवानगी
- मुख्यमंत्री हिमंता यांचा दावा, आसाममधून यावर्षी ‘AFSPA’ हटवण्यात येईल
- थोरला नाही, धाकटा नाही, भाऊबंदकी चालणार नाही; महाविकास आघाडीत काँग्रेसचा नवा मेरिट फॉर्म्युला!!