विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर : वीज गेल्याने जनरेटर लावून झोपल्याने संपूर्ण घर धुराने भरल्याने गुदमरून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. Six members of the same family were killed due to smoke of generator
चंद्रपूर जवळील दुर्गापूर येथे ही दुर्दैवी घटना घडली. वीज गेल्याने रात्री जनरेटर लावून हे कुटुंब झोपलं होतं. मात्र जनरेटरच्या धुरामुळे लष्करे कुटुंबातील चार मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाला.
चंद्रपूर शहरालगत दुर्गापूर भागात लाईट गेली होती. त्यामुळे लष्करे कुटुंबाने घरातील जनरेटर लावला होता. रात्री जनरेटर तसाच लावून हे कुटुंब झोपी गेलं. मात्र जनरेटरच्या धुराने घर भरलं. या धुरामुळे झोपेतच सर्वजण गुदमरले आणि 7 पैकी 6 जणांचा मृत्यू झाला. लष्करे कुटुंब मजुरी करते.
सकाळी शेजारच्या लोकांना शंका आल्यावर घटना उघडकीस आली. सर्व मयत आणि एकमेव वाचलेल्या व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. रमेश लष्करे- 44, अजय लष्करे-20, लखन लष्करे 9, कृष्णा लष्करे आठ, माधुरी लष्करे 18, पूजा लष्करे 14 यांचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला. तर दासू लष्करे 40 हा एकमेव सदस्य यातून वाचला.
Six members of the same family were killed due to smoke of generator
महत्त्वाच्या बातम्या
- नाशिकच्या नोट छापण्याच्या कारखान्यातून पाच लाख रुपये गायब, व्यवस्थापन हादरले, तपास सुरू
- तेलंगणात ५० कोटींची लाच देऊन रेवणनाथ रेड्डींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद मिळविल्याचा काँग्रेस सरचिटणीसाचाच आरोप
- नाना बोलले, त्यांचे काय चुकले…?? ते खरे बोलले हे चुकले काय…??
- शंभर कोटी रुपये वसुलीप्रकरणी सचिन वाझे आणि अनिल देशमुखांच्या पीएना समोरासमोर बसवून चौकशी
- ठाकरे सरकारचा पाय खोलात, उच्च न्यायालय म्हणाले अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करताना सचिन वाझेला सेवेत रुजू कोणी करून घेतले ते पाहणे महत्वाचे