sirisha bandla : कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांच्यानंतर आता आणखी एक भारतकन्या अंतराळ प्रवास करणार आहे. तिचे नाव सिरीशा बंदाला असे आहे. रिचर्ड ब्रॅन्सन यांची अंतराळ कंपनी व्हर्जिन गॅलॅक्टिकचे अंतराळ यान व्हर्जिन ऑर्बिटमध्ये बसून 11 जुलै रोजी सिरीशा अंतराळयात्रेवर जाईल. sirisha bandla Became Third indian american astronaut To Space Travel in virgin Orbit
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांच्यानंतर आता आणखी एक भारतकन्या अंतराळ प्रवास करणार आहे. तिचे नाव सिरीशा बंदाला असे आहे. रिचर्ड ब्रॅन्सन यांची अंतराळ कंपनी व्हर्जिन गॅलॅक्टिकचे अंतराळ यान व्हर्जिन ऑर्बिटमध्ये बसून 11 जुलै रोजी सिरीशा अंतराळयात्रेवर जाईल.
रिचर्ड ब्रॅन्सनच्या पाच अंतराळवीरांपैकी एक सिरीशा बंदाला आहे. सिरीशा व्हर्जिन गॅलॅक्टिक कंपनीच्या गव्हर्नमेंट अफेअर्स अँड रिसर्च ऑपरेशन्सची व्हाइस प्रेसिडेंट आहे. केवळ सहा वर्षांत सिरीशाने व्हर्जिन गॅलॅक्टिकमध्ये असे उच्चपद मिळवले आहे. सिरीशा अंतराळात जाणार असल्याची बातमी समोर येताच सोशल मीडियावर तिच्या अभिनंदनाच्या पोस्टचा पाऊस पडत आहे. सिरीशा भारतातील आंध्र प्रदेश, गुंटूरमधील असल्याचा अभिमान वाटतोय.
सिरीशा ही आंध्र प्रदेशातील गुंटूरचा रहिवासी आहे. सिरीशाने एरोनॉटिकल / अॅस्ट्रोनॉटिकल इंजिनीअरिंगची पदवी पर्ड्यू युनिव्हर्सिटीमधून प्राप्त केली. त्यानंतर तिने जॉर्जटाउन विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली. सिरिशा सध्या व्हर्जिन ऑर्बिटचे वॉशिंग्टन ऑपरेशनसुद्धा हाताळत आहे.
तेलुगू असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका (टीएएनए) शीही सिरीशा जोडलेली आहेत. ही उत्तर अमेरिकेतील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी इंडो-अमेरिकन संस्था आहे. काही वर्षांपूर्वी या संस्थेने सिरीशाला युवा स्टार पुरस्काराने गौरविले होते. याव्यतिरिक्त सिरीशा अमेरिकन अॅस्ट्रोनॉटिकल सोसायटी आणि फ्यूचर स्पेस लीडर फाउंडेशनच्या संचालक मंडळावर आहे. ती पर्ड्यू युनिव्हर्सिटीच्या यंग प्रोफेशनल अॅडव्हायझरी कौन्सिलची सदस्यही आहेत.
एवढ्या कमी वयात एवढी मोठी झेप घेणाऱ्या सिरीशाचे जगभरातून कौतुक होत आहे. आणखी एक भारतकन्या अंतराळ सफरी जात असल्याने देश-विदेशातील भारतीयांना अभिमान वाटतोय.
sirisha bandla Became Third indian american astronaut To Space Travel in virgin Orbit
महत्त्वाच्या बातम्या
- Covaxin च्या थर्ड फेज ट्रायलचे रिझल्ट जाहीर, कोरोनाच्या गंभीर प्रकरणातही 93% प्रभावी ठरली भारतीय लस
- हाकेच्या अंतरावरील ईडी कार्यालयात जाणे कोरोनामुळे टाळणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अचानक दिल्लीला रवाना
- Ashadhi Wari 2021 : पायी वारीसाठी आग्रही असणाऱ्या बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात
- Aamir Khan Announces Divorce : आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट, लग्नाच्या 15 वर्षांनी मार्ग झाले वेगळे
- अवघ्या 115 दिवसांत उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, घटनात्मक अडचण काय? पुढेच मुख्यमंत्री कोण? जाणून घ्या!