विशेष प्रतिनिधी
सिंगापूर – येथे चोवीस तासात ८३७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा आकडा एका वर्षातील सर्वाधिक आहे. त्यामुळे कोरोनाचा पुन्हा फैलाव होत असल्याचे चित्र आहे. Singapore, Briton struggling to deal with corona
सिंगापूरमध्ये ८० टक्के लसीकरण झालेले असताना कोरोना संसर्ग पसरत आहे. काल देशातील ८०९ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यापैकी ७५ जण गंभीर आजारी असून त्यांना ऑक्सिजन द्यावे लागत आहे. गेल्या २८ दिवसात चौघांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांची संख्या दोन दिवसांत दुप्पट झाली आहे. त्यामुळे संसर्गाची तीव्रता पाहता देश लॉकडाउनुमक्त करण्याचा निर्णय सध्या लांबणीवर टाकला आहे.
- Corona Vaccination : कोरोनाविरुद्ध लसीकरणाचा देशात नवा विक्रम, एका दिवसात ९३ लाखांहून जास्त डोस दिले
दरम्यान ब्रिटनमध्ये हिवाळ्यात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी विंटर प्लॅन जारी केला आहे. नाइट क्लब, म्युझिक वेन्यू, बिझनेस कॉन्फरन्स, स्टेडीयम आदी ठिकाणी व्हॅक्सिन पासपोर्ट लागू केला आहे. केवळ लसीकरण झालेल्या नागरिकांनाच कार्यक्रमाच्या ठिकाणी सोडले जाणार आहे. तसेच मास्कचे बंधन घातले आहे. पुढील आठवड्यात ५० पेक्षा अधिक वयोगटातील लोकांसाठी बूस्टर डोस दिला जाणार आहे. ब्रिटनमध्ये अजूनही दररोज ३० हजारापेक्षा अधिक रूग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत ७२.८ लाख जणांना बाधा झाली आहे.
Singapore, Briton struggling to deal with corona
महत्त्वाच्या बातम्या
- जगातील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींमध्ये पंतप्रधान मोदी, आदर पूनावाला, ममता बॅनर्जी यांचेही नाव
- अनिल देशमुख यांचे तत्कालिन खासगी सचिव संजीव पलांडे निलंबित, शंभर कोटींच्या प्रकरणात होते कोठडीत
- मोठी बातमी : भारताचे स्टॉक मार्केट जगातील 5वे सर्वात मोठे, BSE लिस्टेड कंपन्यांचे बाजारमूल्य 260 लाख कोटी रुपयांवर
- Aukus : अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाची नवीन ‘सुरक्षा युती’ची घोषणा, फ्रान्सला धक्का, तर चीनची तिन्ही देशांवर आगपाखड