- चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या वडिलांच्या डोळ्यांत पाणी तरळले, आसामच्या लवलिनानं संकटांवर मात करत ऑलिम्पिक पदक निश्चित केले.
- विजयाच्या बातमीनंतर सिंधूचे वडील पी.व्ही.रमना यांनी सांगितले की, ते त्यांच्या मुलीच्या कामगिरीवर आनंदी आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: वेटलिफ्टर मीराबाई चानू हिच्यानंतर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सर लवलिना बोरगोहाईं ( Lovlina Borgohain ) हिनं भारतासाठी आणखी एक पदक निश्चित केले. शुक्रवारी लवलिनानं महिलांच्या बॉक्सिंगच्या ६९ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व लढतीत लवलीना हिने तैवानच्या निएन चिन चेन हिच्यावर एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
तर दुसरीकडे सिंधूने जपानच्या अकाने यामागुचीला पराभूत करून महिला बॅडमिंटन एकेरीत उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला.
या दोघी भारत की बेटी आहेत .यांच्या कामगिरीवर संपूर्ण देशाला गर्व आहे .
त्यांच्या वडिलांच्या प्रतिक्रिया देखील समोर आल्या आहेत –
पीवी रमना – सिंधूचे वडिल
पीव्ही सिंधूला प्रशिक्षकिंनी ज्या प्रकारे प्रशिक्षण दिले, तीने चांगले काम केले. तिने जास्त आक्रमकता दाखवली नाही पण परिपक्वता आणि शांत मनाने खेळली. मी अजून तिच्याशी बोललो नाही , मी संध्याकाळी तीला बोलणार आहे . ”
रमणाने सांगितले की सिंधूला निश्चितच धार आहे पण शेवटी चांगला खेळाडू जिंकेल.
आपण प्रार्थना करूया आणि आशा करू की एक चांगला परिणाम आपल्याला मिळेल .
लवलिनानं किमान कांस्यपदक निश्चित केलं आहे आणि तिनं सूवर्णपदक नावावर करून भारतात यावं अशी देशवासियांची इच्छा आहे. आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील बारोमुखीया गावातल्या लवलिनाच्या यशामागे प्रचंड संघर्ष आहे आणि त्यामुळे या पदकाचे मोल सर्वांपेक्षा तिला व तिच्या कुटुंबीयांसाठी अधिक आहे.
काय म्हणाले वडिल – टिकेन बोर्गोहेन
”माझ्या पत्नीला दुसरं आयुष्य मिळालं आणि आता लवलिना पदक घेऊन घरी येणार आहे, यापेक्षा अधिक काय हवंय.
टिकेन हे बारोमुखिया येथील चहाच्या मळ्यात काम करतात. लवलिना लहान असताना जुळ्या बहिणी लिमा व लिचा यांना मुआय थाय ( बॉक्सिंग आणि टायक्वांडो यांचा एकत्रित क्रीडा प्रकार) खेळताना पाहायची.
कुटुंब आर्थिक संकटाशी झगडत असूनही टिकेन यांनी मुलींची खेळाडू बनण्याची आवड जपली. त्यांचे स्वतःचं छोटसं शेत होतं आणि शिवाय ते चहाच्या मळ्यात काम करायचे, त्यासाठी त्यांना महिन्याला २५०० रुपये मिळायचे. लिमा व लिचा मार्शल आर्ट्स खेळायच्या आणि लवलिनानेही तोच खेळ स्वीकारला.
मुलींचे खेळाडू बनण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी माझ्या पत्नीनं ५० हजार ते दीड लाखांचं कर्ज घेतलं होतं. त्यांच्या या बलिदानाचं आज चीजं झाले.