विशेष प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : चिपी विमानतळासंदर्भात आम्हाला कोणतेही श्रेय घेण्याचा प्रश्न नाही. अवघ्या २५०० रुपयांत सिंधुदुर्ग ते मुंबई असा विमान प्रवास कोकणवासीयांना उपलब्ध होणार आहे. याचा अधिक आनंद असल्याचं खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. Sindhudurg-Mumbai flight For Rs 2,500: vinayk Raut
चिपी विमानतळ कोणी सुरु केले, हे महत्त्वाचे नाही तर विमानतळ सुरू होऊन जिल्हावासियांना विमानसेवा मिळावी हा हेतू आहे. चिपी विमानतळाला चारी बाजूला रस्त्याची कनेक्टिव्हिटी आहे. पिंगुळी ते चिपी विमानतळ रस्ता उद्घाटनापर्यंत खड्डेमुक्त करु. मात्र पावसाळ्यानंतर हा रस्ता करणार असल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिली. सुरेश प्रभू त्यांना बोलवले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
- सिंधुदुर्ग -मुंबई विमान प्रवास २५०० रुपयांत
- कोकणवासीयांना विमानसेवा मिळतेय याचा आनंद
- चिपी विमानतळ कोणी सुरु केले, हे महत्त्वाचे नाही
- विमानतळाला चारी बाजूला रस्त्याची कनेक्टिव्हिटी
- पिंगुळी ते चिपी रस्ता उद्घाटनापर्यंत खड्डेमुक्त करु
- पावसाळ्यानंतर रस्ता चांगला करण्याचे आश्वासन