विशेष प्रतिनिधी
देशाचे रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रेल्वेमंत्री वैष्णव विमान प्रवासादरम्यान सामान्य नागरिकाप्रमाणे रांगेत उभे असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करणार्या व्यक्तीने लिहिले आहे की, आजच्या काळात एक नगरसेवक सुद्धा व्हीआयपी असल्याचे भासवतो . अशा स्थितीत आपल्या जोधपूरचा अभिमान आणि भारताचे रेल्वेमंत्री अश्वनी वैष्णव शिष्टतेने मार्गस्थ झाले आहेत. हा नम्रतेचा आणि साधेपणाचा पुरावा आहे.
- देशाचे रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव
- विमान प्रवासात सामान्य नागरिकाप्रमाणे रांगेत
- जिथे नगरसेवक सुद्धा व्हीआयपी ट्रिटमेंट घेतो
- तिथे देशाचे रेल्वेमंत्री चक्क रांगेत उभे राहतात
- हाच भारताला यशस्वी बनवण्याचा मार्ग आहे
- नम्रपणा आणि साधेपणाने हे सर्वोत्तम उदाहरण
- अश्विनी वैष्णव यांच्या कृतीला सलाम !