• Download App
    काश्मीरमधील हंडवारामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा; काश्मिरी पंडितांकडून ३२ वर्षांनंतर उत्साहात Shrikrishna Janmashtami celebrations at Handwara in Kashmir; Kashmiri Pandit celebrated after 32 years

    काश्मीरमधील हंडवारामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा; काश्मिरी पंडितांकडून ३२ वर्षांनंतर उत्साहात

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील हंडवारा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण आज मोठ्या उत्साहात काश्मिरी पंडितांनी साजरा केला. विशेष म्हणजे गेल्या ३२ वर्षात प्रथमच अशा प्रकारे उत्साहात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली आहे.Shrikrishna Janmashtami celebrations at Handwara in Kashmir; Kashmiri Pandit celebrated after 32 years

    श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त काश्मिरी पंडितांनी लाल आणि भगवे ध्वज हातात धरून हंडवारा येथे मिरवणूक काढली. देशात ज्या प्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होते. त्या परंपरेप्रमाणे हा उत्सव येथे साजरा करण्यात आला.

    उत्सवात सामील झालेले सामाजिक कार्यकर्ते घ मोही उद्दीन झाब म्हणाले, श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण काश्मीरमध्ये तब्बल ३२ वर्षांनंतर उत्साहात प्रथम साजरा झाला. आम्ही तो आमचे बांधव काश्मिरी पंडितांसमवेत साजरा करत असल्याने आनंद वाटला. या माध्यमातून काश्मीरमध्ये पुन्हा बंधु भावाच्या प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत.

    Shrikrishna Janmashtami celebrations at Handwara in Kashmir; Kashmiri Pandit celebrated after 32 years

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!