• Download App
    SHOW MUST GO ON : एका क्रिकेटरची गोष्ट...विष्णू सोलंकी- नवजात मुलीचा मृत्यू- तरीही खेळला - शतक झळकावले- सलाम कर्तव्य कर्तव्यनिष्ठतेला.... SHOW MUST GO ON: The story of a cricketer ... Vishnu Solanki - Death of a newborn girl - still played - scored a century - salute to duty ....

    SHOW MUST GO ON : एका क्रिकेटरची गोष्ट…विष्णू सोलंकी- नवजात मुलीचा मृत्यू- तरीही खेळला – शतक झळकावले- सलाम कर्तव्यनिष्ठतेला….

    बडोद्याचा क्रिकेटर विष्णू सोलंकी याने शुक्रवारी रणजी ट्रॉफी २०२२ (Ranji Trophy 2022) स्पर्धेमध्ये चंदीगडविरुद्ध शतक झळकावले.


    काही दिवसांपूर्वीच त्याची नवजात मुलगी जन्मानंतरच मरण पावली. या घटनेने कोणतीही व्यक्ती खचून गेली असती, पण ही घटना बाजूला ठेवून विष्णू बडोद्याचा रणजी सामना खेळण्यासाठी कटकला पोहोचला.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : बडोद्याचा क्रिकेटर विष्णू सोलंकी याने शुक्रवारी रणजी ट्रॉफी 2022 सामन्यात चंदीगडविरुद्ध शानदार शतक झळकावले. विष्णू चंदीगड विरूद्धच्या मॅचमध्ये दुसऱ्या दिवसाअखेर 103 रन काढून नाबाद होता.बडोद्याकडून पाचव्या क्रमांकावर उतरलेल्या विष्णूनं 161 बॉलमध्ये 12 चौकरांच्या मदतीनं शतक झळकावलं. विष्णूच्या या खेळीबद्दल प्रत्येक जण त्याला सलाम करत आहे. कारणही तसंच आहे स्वतःच दुःख बाजूला ठेवत show must go on प्रमाणे तो खेळला…विष्णूच्या लहान मुलीचं या मॅचपूर्वीच निधन झालं होतं…SHOW MUST GO ON: The story of a cricketer … Vishnu Solanki – Death of a newborn girl – still played – scored a century – salute to duty ….

    काही दिवसांपूर्वीच सोलंकी याच्यावर दुखाचा डोंगर कोसळला. त्याच्या नवजात मुलीचे निधन झाले होते. हे दु:ख विसरून मुलीचे अंतिम संस्कार करून विष्णू संघात सामील झाला होता. त्याने दुसऱ्या दिवशी अप्रतिम शतक लगावले. यानंतर चाहत्यांनी आणि माजी क्रिकेटपटूंनी त्याच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

    क्रिकेटर शेल्डन जॅक्सनने (Sheldon Jackson) सोशल मीडियावर विष्णू सोलंकी याच्या कामगिरीला सलाम करत लिहिले आहे की, “ज्यांना मी ओळखतो त्यांपैकी तो सर्वात मजबूत खेळाडू आहे. विष्णूला व त्याच्या कुटुंबाला सलाम. हे सोपे नाही. तू खूप शतके झळकव आणि यश मिळव.” तसेच अनेक क्रिकेट चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे.

    पहिला सामना खेळताना विष्णू सोलंकीने १०३ धावांची नाबाद खेळी खेळी खेळत शतक झळकावले. सोलंकीने आपल्या खेळीसाठी १६१ चेंडू खेळून १२ चौकार मारले, जे पूढील काळात लक्षात राहील.

    बडोदा क्रिकेट असोसिएशनचे सीईओ शिशिर हतंगड़ी यांनीही फलंदाजाला सलाम केला. ट्विट केले, “एका क्रिकेटरची गोष्ट ज्याने काही दिवसांपूर्वी आपले नवजात बाळ गमावले. मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर क्रिकेटपटू काही दिवसातच टीममध्ये सामील झाला, आणि दमदार शतक झळकावले. कठीण काळातून जात असताना देखील क्रिकेटपटूने आपली जबादारी पार पाडली त्यामुळेच त्याला खरा हिरो म्हंटले जात आहे.

    विष्णू ११ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री सोलंकीच्या मुलीचा जन्म झाला होता. मुलगी झाल्याचा त्याचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. अवघ्या २४ तासांमध्ये त्याची मुलगी मरण पावली. विष्णू त्यावेळी रणजी स्पर्धा खेळण्यासाठी भुवनेश्वरमध्ये होता. मुलीच्या निधनाची बातमी समजताच तो बडोद्याला गेला. मुलीवर अंत्यसंस्कर करून तो तीन दिवसांमध्ये संघात परतला आणि त्याने शतक झळकावले.

    SHOW MUST GO ON: The story of a cricketer … Vishnu Solanki – Death of a newborn girl – still played – scored a century – salute to duty ….

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य