विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले असून वाझे – वसुलीचे सरकार आहे. पूर्वी देवीचा रुग्ण दाखवा आणि हजार रुपये मिळवा, अशी घोषणा केली जात होती. आता मुख्यमंत्री दाखवा आणि हजार रुपये मिळवा, अशी खरमरीत टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी केली.
राज्य अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारच्या नाकर्तेपणाचा त्यांनी पाढा वाचून दाखविला.
ते म्हणाले, सरकार वाझे -वसुलीत गुंतले आहे. राज्यात मटका आणि गुटखा या सारखे अवैध धंदे सुरु आहेत. याबाबतव्हे पुरावेच मी अधिवेशनात सादर करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. पण, झोपेचे सोंग घेतलेले हे सरकार आहे. ते म्हणते असे कोणतेही धंदे राज्यात सुरु नाहीत.
-मुख्यमंत्री दाखवा, हजार रुपये मिळवा
-महाविकास आघाडी सर्वच पातळ्यांवर अपयशी
– राज्यामध्ये वाझे- वसुली सरकारचे खेळ सुरू
– मटका आणि गुटखा या सारखे अवैध धंदे सुरु
– सदाभाऊ खोत यांनी उपटले सरकारचे कान
– नाकर्तेपणाचा त्यांनी पाढा वाचून दाखविला