वृत्तसंस्था
पुणे : आपल्या अमोघ वाणीने आणि लेखणीने अखंड महाराष्ट्रात आणि परदेशात छत्रपती शिवाजी महाराज यांची कीर्ती सांगणारे शिवशाहीर, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ ‘शतकपूर्तीचा रंगावली’ या प्रदर्शनाने झाला. तसेच ९९ दीप प्रज्वलित करुन त्यांना मानवंदना देण्यात आली.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व इतिहास प्रेमी मंडळातर्फे ‘शतकपूर्तीचा रंगावली’ प्रदर्शन भरविण्यात आले आहे. ८० वर्षे शिवचरित्र प्रसाराचे काम, तब्बल ५ लाख किमी प्रवास, राजाशिवछत्रपती ग्रंथाच्या १७ आवृत्त्या, जगभरात २५ हजार व्याख्याने, ३ कोटी रुपयांचा दानधर्म आणि आशियातील दुस-या क्रमांकाचे महानाट्य जाणता राजाचे १२०० प्रयोग व १ कोटी प्रेक्षक असा थक्क करणारा त्यांचा जीवनप्रवास आहे. वयाच्या शतकपूर्तीकडे वाटचाल करणा-या पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भव्य रंगावली व ९९ दीप प्रज्वलित करुन मानवंदना देण्यात आली.
- भव्य रंगावली व ९९ दीप प्रज्वलित करुन मानवंदना
- अवघे जीवन छत्रपती शिवाजी महाराजांना अर्पित
- ८० वर्षे शिवचरित्र प्रसाराचे काम
- तब्बल ५ लाख किमी प्रवास
- राजाशिवछत्रपती ग्रंथाच्या १७ आवृत्त्या
- जगभरात २५ हजार व्याख्याने
- ३ कोटी रुपयांचा दानधर्म
- जाणता राजाचे १२०० प्रयोग व १ कोटी प्रेक्षक
- आशियातील दुस-या क्रमांकाचे महानाट्य