नाशिक : शिवसेनेत असंतोष मावेनासा झाला आहे. पक्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत जर सोडले तर कोणी “लाभार्थी” नाही आणि त्यामुळे समाधानी नाही. Shivsena Unrest: Thackeray’s “excerpt” on dissatisfaction; The eyes of the NCP; Cannon fired at BJP !!
- – शिवसेनेचे 25 ते 30 आमदार निधी वाटपातील भेदभावावरून नाराज
- – ज्यांच्या चौकशा चालू ते प्रताप सरनाईकांपासून आनंद अडसूळ, भावना गवळी, अनिल परब, यशवंत जाधव हे सर्व हैराण आणि नाराज
- – गजानन कीर्तीकर, अनंत गिते, रामदास कदम हे नेते नाराज
- – एकनाथ शिंदे, अजय चौधरी ठाण्यात नाराज
- – राजेश क्षीरसागर कोल्हापूरात नाराज
यादी फार मोठी आहे… सगळ्यात कॉमन फॅक्टर एकच आहे, राष्ट्रवादी कॉंग्रेसची दादागिरी… आणि निधी वाटपातील भेदभाव. हा भेदभाव “मुख्यमंत्री” उद्धव ठाकरे दूर करू शकत नाहीत, हे गेल्या सव्वा दोन वर्षात दिसले आहे.म्हणून “शिवसेना पक्षप्रमुख” उद्धव ठाकरे यांनी यावर “उतारा” काढलाय… राष्ट्रवादी कडे करा काणाडोळा, भाजप वर तोफा डागा…!!
- भाजप वर तोफा डागायला काहीच हरकत नाही… पण यातून…
- – 25 ते 30 शिवसेना आमदारांना समाधानकारक निधी मिळेल का??
- – ज्यांच्या चौकशा आणि तपास चालू ते थांबतील का??
- – एकनाथ शिंदे विरुद्ध जितेंद्र आव्हाड हा ठाण्यातला वाद मिटेल का??
- – कोल्हापूर उत्तरचा राजेश क्षीरसागर यांचा असंतोष शमेल का?? मातोश्रीवर बोलवूनही राजेश क्षीरसागर काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ देतील का??
- – भाजप वर तोफा डागून वरील प्रश्न मिळतील?? असंतोष शमेल का??
- – उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्या बरोबरीने… निदान खालोखाल शिवसेना, नेते, आमदार, शिवसैनिक “लाभार्थी” होतील का…??… हे खरे कळीचे प्रश्न आहेत आणि शिवसेनेच्या मूळ दुखण्याचे इंगित त्यामध्ये दडले आहे.
Shivsena Unrest : Thackeray’s “excerpt” on dissatisfaction; The eyes of the NCP; Cannon fired at BJP !!
महत्त्वाच्या बातम्या
- हाँगकाँगमध्ये कोरोनाचा हाहाकार : मृत्यू वाढल्याने शवपेट्यांचा तुटवडा, मृत्यूदर पंधरापट जास्त
- मास्कच्या आवश्यकतेतून सूट देण्याचाही विचार व्हावा वैद्यकीय तज्ज्ञांची सरकारकडून अपेक्षा
- The Kashmir Files : “द काश्मीर फाईल्स” चार दक्षिण भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार!!
- नवीनचे पार्थिव बेंगळुरूला पोहोचले