• Download App
    Shivsena - BJP differences ends amicably सकाळी नाराजी, संध्याकाळी तोडगा; फडणवीस + शिंदेंनी विषय मिटवला!!

    सकाळी नाराजी, संध्याकाळी तोडगा; फडणवीस + शिंदेंनी विषय मिटवला!!

    Shivsena - BJP

    नाशिक : स्थानिक राजकारणाच्या गदारोळात दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्येच एकमेकांना फोडून स्वबळ वाढवायची स्पर्धा लागली त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये तीव्र नाराजी पसरली त्याचे पडसाद फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी बैठकीत आणि नंतर उमटले, पण सकाळची नाराजी संध्याकाळच्या तोडग्यामुळे संपुष्टात आली.Shivsena – BJP differences ends amicably

    भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदे यांना अडचणीचे ठरतील असे पक्ष प्रवेश भाजपमध्ये करून घेतले. त्याबद्दल स्वतः एकनाथ शिंदे यांनी कुठलीच जाहीर नाराजी व्यक्त केली नाही, पण त्यांच्या 7 मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घालून आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर बोलून तक्रार केली. त्याचवेळी सांगली, सोलापूर, सातारा, पुणे इथले पक्षांतराचे विषय सुद्धा समोर आले.



    देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंच्या मंत्र्यांना शिंदे समोर झापल्याच्या बातम्या सगळ्या मराठी माध्यमांनी रंगवून दिल्या. आता शिंदे आणि फडणवीस यांच्यात फाटले. त्यामुळे युती तुटायच्या मध्यावर येऊन थांबल्याची मखलाशी अनेकांनी केली.

    – एकमेकांचे पक्ष फोडणे बंद

    परंतु, प्रत्यक्षात स्थानिक राजकारणातली स्पर्धा स्थानिक ठिकाणीच ठेवून एकमेकांचे पक्ष फोडू नयेत असे ठरल्याने सकाळच्या नाराजीवर संध्याकाळी पडला पडला. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची भावना समजून घेतली. आम्हाला जे बोलायचे ते आम्ही त्यांच्याशी बोललो. उगाच एकमेकांचे पक्ष फोडायच्या फंदात पडायचे नाही, असे दोघांनी ठरविले. याची सविस्तर माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकारांना दिले.

    पण आज दिवसभर शिंदे आणि फडणवीस यांच्या पक्षातल्या मतभेदांचा मुद्दा माध्यमांसाठी मोठे राजकीय खाद्य ठरला. तो आणखी काही दिवस रेटून पुढे चालवायचा माध्यमांचा इरादा होता पण संध्याकाळ होता होता दोन्ही पक्षांच्या वादावर पडला पडला त्यामुळे वादाच्या शिळ्या कढीला उत आणण्याखेरीज माध्यमांना पर्याय उरला नाही.

    – अजितदादांच्या राष्ट्रवादीची नाही हिंमत

    पण काही झाले तरी एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर नाराजी बोलून दाखवायची आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांना समज द्यायची अशी राजकीय हिंमत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी दाखविली, तरी. पण तेवढे हिंमत अजित पवार किंवा त्यांच्या पक्षातले मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे दाखवू शकले नाहीत. वास्तविक भाजपमध्ये जेवढे इन्कमिंग एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून झाले, त्यापेक्षा जास्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून झाले. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे हात वेगवेगळ्या प्रकरणांच्या दगडाखाली अडकल्याने देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर कुठल्याच बाबतीत नाराजी व्यक्त करायची त्यांची हिंमतच झाली नाही. कारण तशी हिंमत अजित पवार किंवा त्यांच्या मंत्र्यांनी दाखविली असती, तर त्यांना चुकवावी लागणारी राजकीय किंमत शिंदेंच्या सेनेपेक्षा कितीतरी जास्त ठरली असती. हातात कशीबशी मिळालेली सत्ता गमवावी लागली असती. हे राजकीय वास्तव लक्षात घेऊनच अजितदादा आणि त्यांच्या मंत्र्यांनी कुठलीच नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर बोलून दाखविली नाही.

    Shivsena – BJP differences ends amicably

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    शिंदे गटाच्या 7 मंत्र्यांची नाराजी; पण अजितदादांना आणि त्यांच्या मंत्र्यांना नाराज होणे परवडेल का??

    वांद्रे किल्ल्यावर ओली पार्टी; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती??

    बाळ ते बाळासाहेब; मीरा भाईंदरच्या नव्या कलादालनातून उलगडला भव्य व्यक्तिमत्त्वाचा प्रवास!!