• Download App
    शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारेच राष्ट्रपतींच्या भेटी घेत आहेत, शिवराजसिंह चौहान यांचा आरोप | The Focus India

    शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारेच राष्ट्रपतींच्या भेटी घेत आहेत, शिवराजसिंह चौहान यांचा आरोप

    सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी काहीही न करणारे आणि शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारी नेतेमंडळीच आता शेतकऱ्यांचे नाव पुढे करून राष्ट्रपतींची भेट घ्यायला जात आहेत, अशी टीका मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला आहे.  Shivraj Singh Chouhan alleges


    वृत्तसंस्था

    भोपाळ : सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी काहीही न करणारे आणि शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारी नेतेमंडळीच आता शेतकऱ्यांचे नाव पुढे करून राष्ट्रपतींची भेट घ्यायला जात आहेत, अशी टीका मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला आहे. Shivraj Singh Chouhan alleges

    मोदी सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. मोदी सरकारवर दबाव आणण्यासाठी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यासमवेत पाच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. Shivraj Singh Chouhan alleges

    या मुद्द्यावरून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शरद पवार आणि इतर नेत्यांवर टीका केली आहे. ते म्हणाले, शेतकरी हा देव असतो. पंतप्रधान मोदी यांनी आणलेला कायदा हा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. हा कायदा क्रांती घडवू शकतो. पण राजकीय नेतेमंडळी शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत.



    प्रसिध्द लेख चेतन भगत यांनीही कृषि कायदा रद्द करण्याची मागणी करणाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. भगत म्हणाले की, कोणताही कायदा परिपूर्ण नसतो. जर कृषी कायद्यांविरोधात भीती आहे तर त्यावर बसून, चर्चा करुन, बदल करुनच तोडगा निघू शकतो.

    Shivraj Singh Chouhan alleges

    परंतू कायदा रद्द करण्याची मागणी म्हणजे भारतीय कृषी क्षेत्रासाठी एक पाऊल मागे गेल्यासारखं होईल. यामध्ये छोट्या उद्योगांतून बाहेर येत भांडवलशाहीची आणि मोठ्या सुधारणेची गरज आहे.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…