• Download App
    शिवसेना खासदार राजेंद्र गावितांवर विनयभंगाचा गुन्हा | The Focus India

    शिवसेना खासदार राजेंद्र गावितांवर विनयभंगाचा गुन्हा

    • त्यांच्याच कंपनीतील महिलेची लैंगिक शोषणाची तक्रार; गावितांनी आरोप फेटाळले

    मुंबई : पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाची तक्रार केली असून त्यांच्याविरोधात नया नगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. shiv sena MP rajendra gavit news

    तक्रारदार पीडित महिला गेल्या 15 वर्षांपासून खासदार राजेंद्र गावितांच्या मीरा रोड शांती नगरमधील देव मोगरा गॅस एजन्सीमध्ये नोकरीस आहे. तिचे म्हणणे असे की गेल्या अनेक वर्षांपासून तिचा लैंगिक छळ आणि शोषण केले जात आहे.



    2005 मध्ये राजेंद्र गावित अचानक तक्रारदार महिलेच्या घरी मोबाईल गिफ्ट घेऊन गेले. त्यावेळी ते गिफ्ट तिने घेण्यास नकार दिला. त्यानंतर राजेंद्र गावित यांनी महिलेला माझ्याशी मैत्री कर तुला घर, पैसा सर्व देतो आणि मला शारीरिक सुख दे, अशी मागणी केल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. shiv sena MP rajendra gavit news

    2015 मध्ये तक्रारदार महिला काम व्यवस्थित करत नाहीत, असा आरोप करून गावितांनी तिला पाण्याची बाटली फेकून मारली. तसेच अंगावर धाऊन येत हात पकडून गैरवर्तन करत धमकी आणि शिवीगाळ देखील केली. नोव्हेंबर 2020मध्ये गावितांनी कार्यालयात एक मीटिंग ठेवली होती, त्यावेळेस किणी नावाचा कर्मचारी उशिरा आला. त्याला गावित यांनी तुला कामावरून काढून टाकेन, असे सांगितले. मी गावितांना विचारले असता, तू मध्ये का बोलते आहेस, असे म्हणून शिवीगाळ करत माझा विनयभंग केला आणि म्हणाले, मी खासदार आहे, तुझी औकात काय आहे, कामावरून काढून टाकतो, तुला कोण कुत्रा विचारणार नाही, असेही पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. shiv sena MP rajendra gavit news

    राजकीय दबावामुळे तक्रार उशिरा दाखल

    या तक्रारीबाबत राजेंद्र गावित यांनी खुलासा केला आहे की, त्या गोष्टीला काही अर्थ नाही, माझ्याविरोधात गुन्हा दाखल झालेला नाही. त्यांनी फक्त लेखी पत्र दिले आहे. माझ्या गॅस एजन्सीमधून गॅसचा काळाबाजार करायचे आणि माझ्या कंपनीत 1 कोटी रूपयांपेक्षा जास्तची अफरातफर त्यांनी केली आहे. मी स्वतः त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. ती सहा दिवस जेलमध्ये होती. माझ्यावरील गुन्हा खोटा आहे, अशी माहिती खासदार गावित यांनी दिली.

    shiv sena MP rajendra gavit news

    राजेंद्र गावित हे आदिवासी नेते म्हणून परिचित आहेत. ते मूळचे नंदुरबार जिल्ह्यातील आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये त्यांनी आदिवासी विकास मंत्री म्हणून काम पाहिले. पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाले आणि 2018 च्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून खासदार म्हणून निवडून आले. 2019मध्ये पालघर लोकसभा क्षेत्र शिवसेनेकडे गेल्यानंतर राजेंद्र गावित हे भाजप सोडून शिवसेनेत दाखल झाले आणि शिवसेनेचे खासदार म्हणून पालघर लोकसभेतून निवडून आले.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…