• Download App
    औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा अधिकार नाही खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारला सुनावलेShiv Sena is happy to carry The palanquin of Nizamshahi , Padalkar alleges

    औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा अधिकार नाही खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारला सुनावले

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात औरंगाजेबाची स्तुती करणारी पोस्ट लिहिली जाते व त्यावरून उस्मानाबादेत दंगे होतात, भगवा ध्वज लावण्यावरून पोलिसांवर दगडफेक होते, या बाबी पाहता औरंगाबादला संभाजीनगर करू म्हणाऱ्यांना निजामशाहीचीच पालखी वाहण्यातच आता जास्त आनंद वाटतो, असेच दिसत आहे, अशी परखड टीका भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली.

    ते म्हणाले, महाराष्ट्रातील कमकुवतपणा व लाचारी लपविण्यासीठी तुम्ही भाजपाला हिंदुत्व शिकवणारे मोठे मोठे लेख लिहिता.

    जनाब राऊत तुम्हाला कदाचित काकांच्या मांडीवरून उस्मानाबादमध्ये झालेला भगव्याचा अपमान व औरंगजेबाच्या अवलादींचा तांडव दिसत नाही का ?
    ऐन हिंदु सणाच्या दिवशी महाराष्ट्राची व हिंदुत्वाची शान असलेला भगवा ध्वज लावण्यावरून ज़र उस्मानाबादमध्ये पोलीसांवर दगडफेक होते. तेव्हा
    उस्मानाबादचे धाराशिव करू म्हणणाऱ्यांच्या हाताला काय लकवा मारतो काय?

    तुमच्या आघाडी सरकारमधील मंत्री स्वांतत्र्यवीर सावरकरांवर उलट सुलट लिहितात. यावेळेस सत्ता टिकविण्यासाठी तुमच्या वाघाचा ससा होतो का?
    औरंगाबादमध्ये गरोदर महिलांवर अत्याचारावर आपल्याला एक ओळ खरडावी वाटत नाही

    औरंगाबादला संभाजीनगर करू म्हणाऱ्यांना आता निजामशाहीचीच पालखी वाहण्यातच जास्त आनंद मिळतोय.. असंच दिसतंय, असे पडळकर म्हणाले.

    – निजामशाहीची पालखी वाहण्यात मोठा आनंद
    – औरंगाजेबाच्या स्तुतीच्यावरून उस्मानाबादेत दंगे
    – भगवा ध्वज लावण्यावरून पोलिसांवर दगडफेक
    – संभाजीनगर, धाराशिव नामांतराचे काय झाले ?
    – सत्ता टिकविण्यासाठी वाघाचा ससा का होतो?
    – गभर्वतीवरील अत्याचारावर ओळही खरडली नाही
    -लाचारी लपविण्यासाठी भाजपाला हिंदुत्वाचे डोस

    Shiv Sena is happy to carry The palanquin of Nizamshahi , Padalkar alleges

    Related posts

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??

    Indian Army पाकिस्तानचे कंबरडे मोडल्यानंतरच भारताने सध्या थांबविले फायरिंग; भारतीय सैन्य दलांचा स्पष्ट खुलासा; शस्त्रसंधी शब्द नाही वापरला!!