कोल्हापूर महापालिकेत कॉंग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी केल्यानंतर शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये कलगीतुरा सुरू झाला आहे. कुणी फुटला तर त्याचा कार्यक्रम ठरलेला, हे पालकमंत्री सतेज पाटील यांचे विधान म्हणजे खुलेआम दहशत पसरविण्याचा प्रकार आहे, असा आरोप शिवसेनेचे कोल्हापूर शहराध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी केला आहे. Shiv Sena-Congress, Shiv Sena is aggressive due to the arrogance of Kalgitura and Satej Patil in Kolhapur
विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत कॉंग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी केल्यानंतर शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये कलगीतुरा सुरू झाला आहे. कुणी फुटला तर त्याचा कार्यक्रम ठरलेला, हे पालकमंत्री सतेज पाटील यांचे विधान म्हणजे खुलेआम दहशत पसरविण्याचा प्रकार आहे, असा आरोप शिवसेनेचे कोल्हापूर शहराध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी केला आहे. Shiv Sena-Congress, Shiv Sena is aggressive due to the arrogance of Kalgitura and Satej Patil in Kolhapur
चार दिवसांपूर्वी कसबा बावडा येथे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा झाला. या मेळाव्यात महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात त्यांनी आम्ही दिलेले उमेदवार अंतिम असतील अशी घोषणा केली होती. हे उमेदवार सर्वांशी चर्चा करून सामोपचाराने ठरवले जातील, अशी पुस्तीही त्यांनी जोडली होती. यानंतर कोणी फुटला तर त्याचा कार्यक्रम करू, असा इशारा त्यांनी दिला होता.
या पार्श्वभूमीवर रविकिरण इंगवले आणि मा. आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. मंगळवारी क्षीरसागर यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीत पालकमंत्री पाटील यांची अवस्था २०१४ सारखी होईल असा इशारा दिला होता. इंगवले यांनीही पत्रकार बैठक घेऊन पालकमंत्री पाटील यांच्या धमकी बाबत निषेध व्यक्त केला.
Shiv Sena-Congress, Shiv Sena is aggressive due to the arrogance of Kalgitura and Satej Patil in Kolhapur
बिहारी पद्धतीने केलेले पालकमंत्र्यांचे भाषण त्यांना शोभत नाही, असा आरोप करताना त्यांनी स्वाभिमानी जनतेने हे खपवून घेऊ नये, असे आवाहनही केले. शिवसेनेच्या नेत्यांनी सुरू केलेल्या या आरोपांमुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्तेत एकत्र असलेल्या या दोन्ही पक्षात वाद वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.