• Download App
    शिवसेना-भाजप राडा : जेव्हा राज्याचे प्रमुख राडा करणार्यांची पाठ थोपटतात ; दस्तुरखुद्द मुख्यमंत्री ठाकरेंनी पाहिले मारामारीचे व्हीडिओ-केले कौतूक ! Shiv Sena-BJP Rada: When the head of the state stands with those doing Rada; Chief Minister Thackeray himself saw the video of the fight and appreciated it!

    शिवसेना-भाजप राडा : जेव्हा राज्याचे प्रमुख राडा करणार्यांची पाठ थोपटतात ; दस्तुरखुद्द मुख्यमंत्री ठाकरेंनी पाहिले मारामारीचे व्हीडिओ-केले कौतूक !

    • शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते राम मंदिराच्या मुद्द्यावरून भिडले Shiv Sena-BJP Rada: When the head of the state stands with those doing Rada; Chief Minister Thackeray himself saw the video of the fight and appreciated it!

    • शिवसेना भवनासमोर शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले होते. राम मंदिराच्या जमिनीच्या बाबतीत घोटाळ्याचा आरोप सामनातून केला गेला होता. आरोपांबाबत भाजपने शिवसेना भवनासमोर आंदोलन केलं, या वेळी दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

    • मुंबईत बुधवारी शिवसेना भवनासमोर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला. सामना या अग्रलेखात राम मंदीर जमिन खरेदीच्या घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेनेने केली होती. यानंतर भाजपने शिवसेनेविरोधात मोर्चा उघडून शिवसेना भवनासमोर आंदोलनाला सुरुवात केली.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई:बुधवारी (16 जून) शिवसेना भवनासमोर राडा करणार्या शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.याच शिवसैनिकांनी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याला लाथेने मारहाण केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर, माहीम, वडाळा भागातील शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचं कौतुक केलं आहे .दरम्यान राडा करत गोंधळ घालणार्यांचे कौतुक एका राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री कसे करू शकतात असा सवाल उपस्थित होत आहे .Shiv Sena-BJP Rada: When the head of the state stands with those doing Rada; Chief Minister Thackeray himself saw the video of the fight and appreciated it!

    उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आहे,असं झी 24 तासच्या बातमीत म्हटलंय.

    शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर, श्रद्धा जाधव यांच्यासह 25 ते 30 शिवसैनिकांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तुमच्या मारामारीचे व्हीडिओ आपण पाहिल्याची प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली, असं बातमीत म्हटलं आहे.

    शिवसेनेने आपल्या ट्विटर हँडलवरुन या भेटीचे फोटो पोस्ट करत शिवसैनिक आणि शिवसेना पक्ष प्रमुख अशी कॅप्शन दिली आहे.

    भाजप कार्यकर्त्यांसोबत झालेल्या वादानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतलेली शिवसैनिकांची भेट ही वेगळेच संकेत देत आहे. या भेटीने उद्धव ठाकरेंनी घडलेल्या प्रकाराबद्दल शिवसैनिकांचं कौतुक करत त्यांचं समर्थन केल्याचं दिसून येतंय

    Shiv Sena-BJP Rada: When the head of the state stands with those doing Rada; Chief Minister Thackeray himself saw the video of the fight and appreciated it!

    Related posts

    जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला तब्बल 15 वर्षांनी पुण्यात अटक; ATS ची कारवाई!!

    राहुल गांधी तर फक्त “निवडक” चुकांची जबाबदारी घेतली; पण काँग्रेसच्या चुकांची किंमत सगळ्या देशाला मोजावी लागली!!

    “नरकातला स्वर्ग” पुस्तकाच्या प्रकाशनाचे निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत शरद पवारांच्या घरी; स्वतः पवारांनीच दिली माहिती!!