विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : अहमदनगरमध्ये आज महापौर निवडणूक पार पडली आहे. पण निवडणुकीच्या आदल्या दिवशी रात्री शिवसेनेच्या दोन नगरसेवकांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. या हाणामारीत शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांना देखील धक्काबुक्की झाल्याची चर्चा आहे. नगरसेविकेचा पती निलेश भांगरे याला मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. पण शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांनी आपल्याला धक्काबुक्की झाली नसल्याचा खुलासा केला आहे.
-निलेश भांगरे यांना मारहाण झाल्याचा आरोप
– अनिल शिंदे आणि संभाजी कदम यांच्यावर ठपका
– दोघांनाच्याही पत्नी या पूर्वी महापौर होत्या.
– जातीवरून शिव्या देऊन मारहाण केल्याचा आरोप
– शिंदे आणि कदम यांनी दारू पाजली
– बोलणं सुरू असताना वाद झाला होता.