Share Market Crashed : गुरुवारी भारतातील दोन जणांमध्ये कोविड-19 च्या नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळल्याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला आहे. शुक्रवारी बाजारात मोठी घसरण झाली. आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 764.83 अंकांनी घसरला. तो 1.31 टक्क्यांनी घसरून 58 हजारांच्या खाली पोहोचला आणि 57,696.46 वर बंद झाला. Share Market Crashed Amid Fear Of Omicron, Sensex Fall by 764 Points Nifty Below 17200
वृत्तसंस्था
मुंबई : गुरुवारी भारतातील दोन जणांमध्ये कोविड-19 च्या नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळल्याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला आहे. शुक्रवारी बाजारात मोठी घसरण झाली. आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 764.83 अंकांनी घसरला. तो 1.31 टक्क्यांनी घसरून 58 हजारांच्या खाली पोहोचला आणि 57,696.46 वर बंद झाला.
एनएसईच्या निफ्टीचीही वाईट स्थिती होती आणि तो पुन्हा एकदा 204.95 अंकांनी म्हणजेच 1.18 टक्क्यांनी घसरून 17,200 च्या खाली गेला. व्यवहाराच्या शेवटी निफ्टी 17,196.70 च्या पातळीवर बंद झाला.
BSE चा 30 शेअर्सचा सेन्सेक्स आज 215.12 अंकांच्या किंवा 0.37 टक्क्यांच्या वाढीसह 58,676.41 वर उघडला, तर NSE चा निफ्टी 68 अंकांच्या किंवा 0.39 टक्क्यांच्या वाढीसह 17,469.65 वर उघडला. लार्सन आणि ट्रुबोच्या समभागांना सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये चांगला फायदा झाला.
गुरुवारी बाजार चांगलाच बहरला होता आणि सेन्सेक्स-निफ्टी दोन्ही जोरदार वाढीसह बंद झाले. 776.50 अंक किंवा 1.35 टक्क्यांच्या वाढीसह बीएसई सेन्सेक्स पुन्हा 58 हजार पार करून 58,461.29 वर बंद झाला होता. तर NSEचा निफ्टी 234.75 अंकांच्या किंवा 1.37 टक्क्यांच्या वाढीसह 17,401.65 वर बंद झाला होता.
Share Market Crashed Amid Fear Of Omicron, Sensex Fall by 764 Points Nifty Below 17200
महत्त्वाच्या बातम्या
- राहुल गांधी म्हणाले- शेतकरी आंदोलनात मृतांच्या कुटुंबीयांना मोदी सरकारने भरपाई द्यावी, यादी नसेल तर आमच्याकडून घ्या!
- पाकिस्तानी अधिकाऱ्यांनीच काढले इम्रान सरकारचे धिंडवडे, पगार न मिळाल्याने थेट ट्वीटरवरच व्यक्त केले दु : ख
- भाजप सत्तेवरून जाईलच, पण काँग्रेस उत्तर प्रदेशात ० वर येईल; ममतांपाठोपाठ अखिलेश यांचाही हल्लाबोल!!
- Navy Day 2021 : नौदल प्रमुख म्हणाले, १० वर्षांचा रोडमॅप तयार, भारतात लवकरच स्वदेशी मानवरहित यंत्रणा असेल
- चंदुकाका सराफ अॅन्ड सन्स, पु. ना. गाडगीळ या नामांकित ज्वेलर्स शॉपमध्ये चोरी करणाऱ्या महिलेला अटक