• Download App
    Sharad Pawar's submission to Congress high command to get rajyasabha seat Inside Story : सुनेच्या पक्षाने झिडकारले, पण काँग्रेस हायकमांडने तारले, त्यामुळेच शरद पवार राज्यसभेत पोहोचले!!

    Inside Story : सुनेच्या पक्षाने झिडकारले, पण काँग्रेस हायकमांडने तारले, त्यामुळेच शरद पवार राज्यसभेत पोहोचले!!

    Inside Story

    नाशिक : सुनेच्या पक्षाने झिडकारले, पण काँग्रेस हायकमांडने तारले, त्यामुळेच शरद पवार राज्यसभेत पोहोचू शकले!!, अशी राजकीय वस्तुस्थिती काल समोर आली. किंबहुना ते राजकीय रहस्य काल उलगडले. राष्ट्रवादीतल्या वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्याने मराठी माध्यमांनी inside story म्हणून या बातम्या वेगवेगळ्या पद्धतीने दिल्या.Sharad Pawar’s submission to Congress high command to get rajyasabha seat

    शरद पवारांना महाविकास आघाडीने राज्यसभेची उमेदवारी दिली. त्यामुळेच भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी सातवा उमेदवार दिला नाही, म्हणूनच महाराष्ट्रातून राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाली आणि शरद पवार राज्यसभेत पोहोचू शकले, अशी वस्तुस्थितीची एक बाजूच आत्तापर्यंत समोर आली होती.



    – विलीनीकरणाचा डाव पाहिला टाकून

    पण महाविकास आघाडीची उमेदवारी घेण्यापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी विलीनीकरण करायचा शेवटचा “डाव” टाकून पाहिला, पण तो “डाव” सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीने बरोबर ओळखला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना कुठलाही प्रतिसाद दिला नाही त्यामुळेच राष्ट्रवादीचे विलीनीकरण टळले आणि शरद पवारांना महाविकास आघाडीची उमेदवारी घेणे भाग पडले.

    – नेमका प्रस्ताव होता तरी काय??

    पण हे सुद्धा सहजासहजी घडले नाही. दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण करावे आणि शरद पवारांना संयुक्त राष्ट्रवादीची राज्यसभेची उमेदवारी द्यावी. त्याचबरोबर पार्थ पवारला सुनेत्रा पवारांच्या जागी राष्ट्रीय सभेवर पाठवावे, असा प्रस्ताव शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला होता. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या प्रस्तावातून विलीनीकरणाचा मोठा “डाव” टाकून पाहिला होता. म्हणजे शरद पवारांना राज्यसभेची सहा वर्षांची उमेदवारी मिळाली असती, तर पार्थ पवारला सुनेत्रा पवारांच्या खासदारकीची उरलेली मुदत मिळाली असती. त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण पण साधले गेले असते, पण सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवारांचा “डाव” बरोबर ओळखला आणि त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रस्तावाला कुठलाच सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.

    – मल्लिकार्जुन खर्गेंपुढे पसरला हात

    त्यामुळे शरद पवारांना महाविकास आघाडीकडे राज्यसभेची उमेदवारी मागणे भाग पडले. मग शरद पवारांना काँग्रेसच्या हायकमांडशी संपर्क साधण्याखेरीज दुसरा पर्याय उरला नाही. शरद पवारांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी थेट संपर्क साधून आपली राज्यसभेची उमेदवारीची इच्छा व्यक्त केली. मल्लिकार्जुन खर्गे यांनी शरद पवारांची इच्छा राहुल गांधींच्या कानावर घातली. राहुल गांधींनी उदार अंतःकरणाने “काँग्रेसी” विचारांच्या शरद पवारांना पाठिंबा द्यायचा निर्णय प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना कळविला. त्यामुळेच शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राज्यसभेत पोहोचू शकले.

    – या राजकारणाचा अर्थ असाच, की…

    पण सगळ्या राजकारणाचा अर्थ असाच, की सुनेच्या पक्षाने झिडकारले, पण ज्या काँग्रेस हायकमांडच्या विरोधात जाऊन शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस काढली, त्याच काँग्रेस हायकमांडच्या दाराशी जाऊन शरद पवारांना राज्यसभेची खासदारकी मिळवावी लागली!!

    Sharad Pawar’s submission to Congress high command to get rajyasabha seat

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे म्हणाले- वाद टाळण्यासाठी शरद पवारांच्या नावाला संमती दिली, आता मोठी प्रतीक्षा करावी लागणार

    CM Devendra Fadnavis : सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर; शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी

    Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प : मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेतकरी कर्जमाफी ते लाडकी बहीण, वाचा सर्वकाही एका क्लिकवर