संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकवर काल दुपारी दगड फेक आणि चप्पल फेक केली. त्यानंतर महाराष्ट्रात प्रचंड राजकीय गदारोळ सुरू झाला असून त्यामध्ये वेगवेगळे राजकीय अँगल जोडले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये निषेध आंदोलने केली आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी चप्पल फेक – दगडफेक या विषयावर वेगवेगळी मते व्यक्त केली आहेत.Sharad Pawar: Stone on “Silver Oak” – Slipper throw – ST employee – Raut – “Matoshri” via NCP … !!; Attack turns and “turns
राऊत यांचे भाजपवर शरसंधान
शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपवर शरसंधान साधले आहे, तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावरच संशय व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते यांनी खरेतर हा हल्ला “मातोश्री”वर करायचा होता म्हणजे अधिक गांभीर्य समजले असते, असे अजब विधान केले आहे,
तर भाजप सरकार मधले माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी संशयाची सुई राष्ट्रवादी काँग्रेसकडेच वळवली आहे. दगडफेक आणि चप्पल फेकीची नुसती पोलीस चौकशी करून खरा निष्कर्ष बाहेर येणार नाही. त्यासाठी सीबीआय चौकशी करावी लागेल, असे अनिल बोंडे म्हणाले आहेत.
600 कोटींचा जमीन घोटाळा
शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा 600 कोटींचा जमीन घोटाळा बाहेर काढला. त्याचा बदला घेण्यासाठी खोट्या आरोपाखाली एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केल्याचे आरोप त्यांच्या पत्नी एडवोकेट जयश्री पाटील यांनी केला आहे.
राजकीय वळणे आणि “वळसे”
या प्रकरणाला अनेक राजकीय वळणे आणि “वळसे” मात्र भरपूर मिळाली आहेत. महाराष्ट्रात अराजक निर्माण करण्यासाठी भाजपनेच फूस लावून गुणरत्न सदावर्ते यांना वाट्टेल तशी भाषणे ठोकण्याची चिथावणी दिली, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
राजकीय भांडवलाचा राऊतांचा डाव
तर या प्रकरणाचे राजकीय भांडवल करण्याचा डाव संजय राऊत यांनी रचला नसेल कशावरून?, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.
“मातोश्री”वर हल्ला
शिवसेनेचे परिवहन मंत्री असताना प्रत्यक्षात “मातोश्री”वर हल्ला करायचा होता म्हणजे या हल्ल्याची खरी किंमत कळली असती, असे अजब वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांनी करून त्याला वेगळा राजकीय अँगल दिला आहे. दिलीप मोहिते पुणे जिल्ह्यातील खेडचे आमदार आहेत. त्यांच्याच मतदारसंघाच्या शेजारच्या मतदारसंघातून म्हणजे आंबेगाव मतदारसंघातून दिलीप वळसे-पाटील हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे मोहिते यांच्या वक्तव्याला मोहिते आणि वळसे यांच्या स्थानिक राजकारणाचा अँगल आहे.
संशयाची सुई राष्ट्रवादीकडे
भाजपचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी सिल्वर ओक वरील दगडफेक आणि चप्पल फेकीचा मास्टर माईंड कोण तर राष्ट्रवादीच, असा आरोप करून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे अनिल बोंडे यांनी संशयाची सुई राष्ट्रवादीकडे वळवली आहे.
पवार – सुप्रिया सुळेंची सुरक्षा वाढवली
विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या या प्रतिक्रियांमधून सिल्वर ओकवर दगडफेक आणि चप्पल फेकीमागे नेमके नेमका कोणाचा हात आहे??, हे बाहेर यायला अजून बराच अवधी लागणार आहे. दरम्यानच्या काळात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची सुरक्षा व्यवस्था मात्र महाराष्ट्र पोलिसांनी वाढवली आहे.
Sharad Pawar: Stone on “Silver Oak” – Slipper throw – ST employee – Raut – “Matoshri” via NCP … !!; Attack turns and “turns
महत्त्वाच्या बातम्या
- सिल्वर ओक दगड – चप्पल फेक : पोलिसांवर ठपका ठेवून निलंबनाच्या कारवाईची शक्यता!!
- उत्तर प्रदेशात आता मदरशांमध्ये ड्रेस कोड आणि शिक्षणक्रमात मोठे बदल; योगी सरकारचा निर्णय!!
- Tukde Tukde Gang : श्रीनगरच्या जामा मशिदीत आजादीच्या घोषणा; 13 जणांना अटक!!
- आरोग्यविषयक चित्रपट नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज – पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर